मुख्य कार्यकारी अधिकारी जेव्हा बॅट हातात धरतात तेव्हा,… पुढे वाचा सविस्तर…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून क्रिडा स्पर्धा…

कोल्हापूर जिल्हा परिषद क्रिडा स्पर्धा अंतर्गत आज क्रिकेट स्पर्धेने सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये 12 तालुक्यातील खेळाडू व जि. प. मुख्यालयातील खेळाडूंनी भाग घेतला आहे. साखळी स्पर्धेत सदरचे सामने पाच दिवस सुरू राहणार आहेत. क्रिकेट सामन्यांचे उद्घघाटन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमास मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन मनीषा देसाई, मुख्य लेखा वित्त अधिकारी अतुल आकुर्डे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अरुण जाधव जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गायकवाड शिक्षण अधिकारी प्राथमिक शेंडकर शिक्षणाधिकारी माध्यमिक एकनाथ आंबोकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रमोद बाबर जिल्हा कृषी अधिकारी अभय कुमार चव्हाण, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन माधुरी परीट तसेच विविध खात्याचे खाते प्रमुख व खेळाडू उपस्थित होते.

सर्व खेळाडूंना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. ह्या वर्षी जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख आणि तालुका स्तरीय खातेप्रमुख यांच्यात प्रदर्शनीय क्रिकेट सामना खेळवला जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः फलंदाजीचा आनंद घेत चौफेर फटकेबाजी केली. सदर सामने शास्त्रीनगर मैदानावर सुरू आहेत.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.