WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार संपूर्ण देश अदानींना विकत सुटलंय-राहूल गांधी

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

डी. के पाटील – (बेळगाव) –   कर्नाटकातील भाजप सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट 40 पर्सेंट कमिशनचे सरकार आहे. ते युवा वर्गाच्या भविष्याशी खेळते आहे. युवकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी येत्या निवडणुकीत ते उलथून टाकून काँग्रेसला विजयी करा असे आवाहन राहुल गांधी यांनी बेळगावात केले. यावेळी काँग्रेस सत्तेवर आल्यास बेरोजगार पदवीधर युवकांना 3 हजार तर डिप्लोमाधारकांना 1500 रुपये दरमहा 2 वर्षांपर्यंत देण्याच्या गॅरंटीकार्डचे अनावरण राहुल गांधी यांनी केले.

मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार संपूर्ण देश अदानींना विकत सुटलंय. सगळी विमानतळे, बंदरे, कंपन्या सरकार त्यांच्या ताब्यात देतंय. हे मी संसदेत जाहीरपणे सांगितलय. केंद्रातील भाजप सरकार आपल्या मित्रांना पुरेपूर फायदा करून देत आहे. हेच कर्नाटकातही सुरु आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला. सरकारच्या या धोरणामुळे देशात बेरोजगारी वाढलीय. यावर काँग्रेसने उत्तर शोधले आहे. सत्तेवर आल्यावर बेरोजगार पदवीधर युवकांना दोन वर्षेपर्यंत दरमहा तीन हजार रुपये बेरोजगारी भत्ता देण्यात येईल त्याचप्रमाणे डिप्लोमाधारक बेरोजगारांना दरमहा 1500 रुपये भत्ता दोन वर्षेपर्यंत देण्यात येतील, त्याशिवाय कर्नाटकमध्ये रिक्त असलेल्या अडीज हजार पदांवर युवकांची भरती करण्यात येईल, पाच वर्षांत राज्यात दहा लाख युवकांना नोकऱ्या देऊ अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधी पुढे म्हणाले, भारत जोडो यात्रेत राज्यातील महिलांनीही महागाई आणि अन्य अडचणी सांगितल्या. त्यांची दखल घेऊन आम्ही सत्तेत आल्यावर गृहलक्ष्मी योजनेतून कुटुंबप्रमुख महिलांना दरमहा प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. बीपीएल कार्डधारक गरिबांना दरमहा दहा किलो तांदूळ मोफत देऊ. त्याशिवाय प्रत्येक कुटुंबाला दरमहा दोनशे युनिट वज मोफत देण्यात येईल. एससी समुदायाचे आरक्षण 15 वरून 17% तर एसटी समुदायाचे आरक्षण 3 वरून 7% करण्याचे आश्वासन भाजप सरकारने पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकसंघ राहून येत्या निवडणुकीत 40 पर्सेंटचे भ्रष्ट भाजप सरकारला पायउतार करावे असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील जनतेला आता बदल हवा आहे. गरीब, कष्टकऱ्यांचे हक्काचे काँग्रेसचे सरकार आणण्याचा निर्धार जनतेने केला आहे. निवडणुकीसाठी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात प्रचारास येईन असे राहुल गांधी यांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप सरकारवर टीकेचे आसूड ओढले. 1924मध्ये बेळगावात झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधींची पक्षाध्यक्षपदी निवड झाली होती. त्याच पुण्यभूमीत आज 100 वर्षानंतर काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर मी या मेळाव्याला संबोधित करतोय हे माझे भाग्य आहे असे सांगून खर्गे म्हणाले, देशात भाजपची मनमानी सुरु आहे. राज्यातील भ्रष्टाचाराबाबत कंत्राटदार संघटनेने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले. याहून मोठा पुरावा काय असू शकतो? मग अमित शाह, सरकार त्याची चौकशी का करत नाहीय असा सवाल त्यांनी केला. 40 पर्सेंट भ्रष्टाचाराचे हे सरकार येत्या निवडणुकीत गाडून टाका असे आवाहन खर्गे यांनी केले. “मोदीजी खूब कोशिश करे हमे मिटानेकि, लेकिन हम बीज है, बार-बार उगेंगे” हा शेरही त्यांनी ऐकवला.

केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले, बेळगावच्या या भूमीतून महात्मा गांधींनी ब्रिटिशांना देशातून हुसकून लावण्याचा संकल्प केला होता. आज याच पुण्यभूमीतून राज्यातील भ्रष्ट भाजप सरकार पाडण्याचा संकल्प काँग्रेस करत आहे, तो यशस्वी करा. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांनी बेळगावात प्रथमच जाहीर सभा घेतली आहे. काँग्रेस ही देशाची शक्ती आहे. युवक, महिला, शेतकरी, गरिबांना शक्ती देणारा हा पक्ष आहे हा जनतेचा विश्वास आहे. सत्तेवर आल्यावर आम्ही तो सार्थ ठरवून दाखवू. युवकांची अपेक्षापूर्ती काँग्रेसने केली आहे. 18 वर्षांवरील युवकांना मतदानाचा अधिकार राजीव गांधी यांनी सर्वप्रथम दिला होता. सत्तेवर आल्यावर युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यात येतील. एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजच्या माध्यमातून सरकारी खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांचा शोध घेऊन युवक-युवतींना देण्यात येतील असे सांगून निवडणुकीसाठी खास युवकांसाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित करण्याची घोषणा केली.

दरम्यान, मेळाव्यात राहुल गांधी व पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते काँग्रेस सत्तेवर आल्यास बेरोजगार पदवीधर युवकांना 3 हजार तर डिप्लोमाधारकांना 1500 रुपये दरमहा 2 वर्षांपर्यंत देण्याच्या गॅरंटीकार्डचे अनावरण करण्यात आले. 
यावेळी व्यासपीठावर काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल, प्रदेश प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला, कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, सलीम अहमद, ईश्वर खांडरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते बी. के. हरिप्रसाद, ज्येष्ठ नेते आर. व्ही. देशपांडे, काँग्रेस प्रचार समिती अध्यक्ष एम. बी. पाटील, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, राज्याध्यक्ष महंमद नलपाड, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, आ. लक्ष्मी हेब्बाळकर, आ. अंजली निंबाळकर यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. युवा क्रांती मेळाव्याला संपूर्ण बेळगाव जिल्ह्यासह हुबळी-धारवाड, कारवार आदी जिल्ह्यातूनही हजारोंच्या प्रचंड संख्येने युवा काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
  • कर्नाटकातील युवाविरोधी भ्रष्ट सरकार उलथून टाका आणि पुढील पाच वर्षे कर्नाटकचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्याचे आवाहन करून माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या म्हणाले,
  • जगात कोणतेही बदल, सामाजिक क्रांती युवकांकडूनच होते हा इतिहास आहे. म्हणूनच राजीव गांधींनी 18वर्षे पूर्ण केलेल्या युवकांना मतदानाचा अधिकार दिला होता. काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वाखाली संगणक क्षेत्रात क्रांतिकारी निर्णय घेऊन लाखो रोजगार युवकांना उपलब्ध करून दिले.
  • मोदींनी वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन देऊन नऊ वर्षे झाली. कर्नाटकात मागल्या दाराने सत्तेत आलेल्या अनैतिक सरकारला चार वर्षे झाली. या अवधीत 16 कोटी रोजगार निर्माण झाले का असा खोचक सवाल त्यांनी केला.
  • आता निवडणुकीसाठी कर्नाटकात मोदींचे दौरे वाढले आहेत. पण महापूर आला, कोरोना काळात ऑक्सिजनअभावी हजारो लोकांचा तडफडून मृत्यू झाला तेंव्हा मोदींचे कर्नाटक प्रेम कुठे गेले होते असा प्रश्न सिद्दरामय्यांनी केला.
  • केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणामुळे देशातील 60 लाख लघु उद्योग बुडाले, 12 लाखांहून अधिक प्रतिभावान युवकांनी करिअर करण्यासाठी परदेश गाठले असा आरोपही त्यांनी केला.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.