कोल्हापूर- राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस, कोल्हापूर चॅप्टर आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जीवरसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र तसेच कृषी रसायने व किड व्यवस्थापन अधिविभागांमार्फत राष्ट्रीय विज्ञान सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
सदर उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन, विख्यात संशोधकाची व्याख्याने आयोजित करण्यात आली. यावेळी विविध अधिविभागांमार्फत “ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिईंग” या विषयावर निबंध स्पर्धा, पोस्टर व मॉडेल स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.
या उपक्रमादरम्यान पुण्याच्या राष्ट्रीय पेशीविज्ञान केंद्राचे संशोधक डॉ-अविनाश शर्मा यांचे व्याख्यान झाले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ- शर्मा यांनी अंटार्क्टिका येथील त्यांच्या संशोधनाचे अनुभव विद्यार्थ्याना सांगितले. जैवतंत्रज्ञान विभागामार्फत निबंध स्पर्धेचे व ऍग्रोकेमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट विभागाने वक्तृत्व स्पर्धेचे नियोजन केले. पोस्टर व मॉडेल प्रदर्शन-स्पर्धाही घेण्यात आल्या. या स्पर्धांचे उद्घाटन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे उपस्थित होते. सदर प्रदर्शनास विविध शाळांतील सुमारे ७५० विद्यार्थ्यांनी भेट दिली.
जीवरसायनशास्त्र अधिविभागातही ऑनलाइन पद्धतीने दोन व्याख्याने झाली. ऑस्ट्रेलिया येथील ऑस्ट्रेलियन अकादमी ऑफ सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. चेन्नूपती जगदीश यांनी विज्ञानातील यश आणि अपयश या विषयावर तर स्वित्झर्लंड येथील लॅबोरेटरी ऑफ मोलेक्युलर इंजिनिअरिंग ऑफ फंक्शनल मटेरियल्स (स्कूल ऑफ बेसिक सायन्सेस)चे संचालक डॉ. मोहमद खाजा नाझीरुद्दिन यांनी नॅनो-मटेरिअल्स वापराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. कार्यक्रमास प्रा- वि- अ- बापट प्रमुख उपस्थित होते- या सर्व विज्ञान दिन उपक्रमाचे नियोजन डॉ. कैलाश सोनवणे, डॉ. ज्योती जाधव, डॉ.पी.एम. गुरव, डॉ. आसावरी जाधव आणि प्रा. यन्कंची यांनी केले. डॉ. पी.के.पवार, डॉ. पी.बी.दांडगे, एस.एस. काळे, डॉ. नईम नदाफ, डॉ. सुषमा पाटील, डॉ. दीप्ती दगडे, डॉ. पल्लवी भोसले, डॉ. चेतन भोसले, डॉ. किशोर खोत, डॉ. चैताली बागाडे, डॉ. नवनाथ कुंभार, हर्षद कांबळे, नितीन नाईक, निर्मला पोखर्णीकर, अंबिका दौंड तसेच संशोधक विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
शिवाजीराव देशमुख व आण्णाभाऊ साठे स्मारकाना 45 कोटी