WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ या विषयावर नेमकं काय झाले.. वाचा सविस्तर, लिंकला क्लिक करा

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे विद्यापिठात बाेलताना

कोल्हापूर महिलांना सुरक्षित सामाजिक पर्यावरण उपलब्ध करून देणे ही सर्वच समाजघटकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी आज येथे केले.महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ या विषयावर आज एकदिवसीय विभागस्तरीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात करण्यात आले. कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे म्हणून  शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक उबाळे, कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

संजय शिंदे म्हणाले, आजची कार्यशाळा ही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत महिला आणि विद्यार्थिनी यांच्या अनुषंगाने आयोजित केली असली तरी त्यापलिकडेही समाजातील सर्वच स्त्रियांप्रती आपला दृष्टीकोन हा संवेदनशील असला पाहिजे, या जाणीवनिर्मितीची त्यामागे अपेक्षा आहे. महिला सुरक्षा धोरणाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत शासन आणि पोलीस प्रशासन गंभीर आहे. तथापि, बदनामीला घाबरून सुमारे ८० टक्के तक्रारी दाखल होत नाहीत. समाज एकजुटीने महिलांच्या पाठीशी उभा राहिला, तर हे चित्र बदलणे सहजशक्य आहे. शासनाव्यतिरिक्त विद्यापीठ अनुदान आयोगानेही महिला सुरक्षेच्या अनुषंगाने निर्देश जारी केले आहेत. या सर्वांची आपल्या सामाजिक-भौगोलिक आवश्यकतांनुसार योग्य अंमलबजावणी करून आपल्या शिक्षण संस्था परिसरातील महिला, विद्यार्थिनींच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यार्थिनींच्या पालकांचा विद्यापीठे, महाविद्यालये आदी शिक्षणसंस्थांवर विश्वास असतो. या परिसरात, तेथील वसतिगृहांत आपल्या पाल्याची योग्य काळजी घेतली जाईल, असे त्यांना वाटते. त्यामुळे आपल्याकडे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीच्या बाबतीत आपण सर्वच जण पालक आहोत, ही भावना घेऊन त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. मुलींकडून प्राप्त होणाऱ्या गंभीर स्वरुपाच्या निनावी तक्रारींचीही संवेदनशीलतेने तपासणी करून तथ्य आढळल्यास वेळीच योग्य ती कार्यवाही करावी. परिसर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करायला हवाच, पण त्याबरोबरच त्यांचे सातत्याने निरीक्षण आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व नियंत्रण राखणे या बाबीही महत्त्वाच्या आहेत. महिला शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थिनींसाठी मूलभूत सोयीसुविधा केल्याच पाहिजेत. स्वच्छतागृहे, तेथील सुविधा, सुरक्षा यांचीही चोख दक्षता घ्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे कार्यरत महिला, विद्यार्थिनींशी सुसंवाद प्रस्थापित करावा, जेणे करून त्यांच्यावरील दबाव, तणाव यांचे वेळीच व्यवस्थापन करणेही शक्य होईल.

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के बाेलताना

कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तसेच कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी आभार मानले.

यानंतर दिवसभरात विविध सत्रांमध्ये महिला सुरक्षेच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव, संकटसमयी मदत घेण्याच्या अनुषंगाने निर्भया पथक प्रमुख पोलीस निरीक्षक क्रांती पाटील, महिला सुरक्षाविषयक कायद्यांच्या अनुषंगाने अॅड. आसावरी कुलकर्णी, विशाखा मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने डॉ. भारती पाटील आणि राजर्षी शाहू शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने डॉ. अशोक उबाळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेस विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.