तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
ग्राहकांना आशयात गुंतवण्याची क्षमता विकसित करा- आदित्य पिंपळे विद्यापीठात डिजिटल मीडियाच्या उत्पन्नाचे स्त्रोतवर कार्यशाळा
झी इंटरनॅशनलच्या विऑन वृत्तवाहिनीचे क्रीडा विश्लेषक गणेश गायकवाड
आदित्य पिंपळे
कोल्हापूर:ओरिजनल, उपयुक्त आणि रोचक आशय दिल्यास डिजिटल माध्यमांत ग्राहक जास्तीत जास्त वेळ गुंतून राहतो. ग्राहक जितका जास्त वेळ माध्यमात रमतील, तितके डिजिटल माध्यमांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता वाढते. यासाठी ग्राहकांना आशयात गुंतवण्याची क्षमता विकसित करा, असे आवाहन झी इंटरनॅशनलच्या विऑन वृत्तवाहिनीचे क्रीडा विश्लेषक आदित्य पिंपळे यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने आयोजित ‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेचे उद्घाटन रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. यावेळी सोलापूर येथील एबी न्यूजचे संपादक गणेश गायकवाड, अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, जयप्रकाश पाटील, डॉ. सुमेधा साळुंखे, अनुप जत्राटकर आदीउपस्थित होते.
सर्व जाहिराती एकाच पेजवर पहा, संपर्क साधा…
आदित्य पिंपळे म्हणाले, डिजिटल माध्यमांसाठी आशय तगडा असावाच लागतो. पण नुसता आशय चांगला असून उपयोगाचा नाही, त्याला मार्केटिंगचीही जोड द्यावी लागते. एक उत्पादन म्हणून त्याचे आक्रमक मार्केटिंग करायला हवे. पारंपरिक पद्धतीचा आशय न देता वेगळा विचार करुन ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन आशयनिर्मिती व्हावी. डिजिटल प्लॅटफॉर्म सातत्याने धोरणांत बदल करत असतात. ही बदललेली धोरणे विचारात घेऊन आशय निर्मिती व्हावी. सर्च इंजिन ऑप्टीमायजेशन, हॅशटॅग, कीवर्ड्स आदींचा वापर करुन स्टोरी बुस्ट करता येते.
आयश निर्मिती करताना तांत्रिक बाबींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. डिजिटल माध्यमांत सादरीकरणाला विशेष महत्त्व आहे. प्रभावी आणि तितकेच परिणामकारक सादरीकरण असेल तरच ग्राहक जास्तीत जास्त वेळ डिजिटल माध्यमांत गुंततो. ग्राहकांना ओरिजनल आशय भावतो. आशय ओरिजनल असावा तरच डिजिटल माध्यमांना उत्पन्न मिळण्याची शक्यता बळावते. रेडिमेड आशय घेऊन कॉपीराईटचे मुद्दे उद्भवू शकतात. ते टाळण्यासाठी कोणाचीही कॉपी न करता आपला स्वतःचा आशय निर्माण करता आला पाहिजे. स्वागत व प्रास्ताविक अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. प्रेरणा पाटील हिने सूत्रसंचालन केेले. ऋषिकेश गोळे यांनी आभार मानले. मान्यवरांच्या हस्ते सहभागींना यावेळी प्रमाणपत्रे देण्यात आली.
गणेश गायकवाड म्हणाले, डिजिटल माध्यमांतून उत्पन्न मिळविण्यासाठी आवड, सातत्य, संयम आणि प्रचंड मेहनत घेण्याची तयारी असली पाहिजे. डिजिटल माध्यमांचा ग्राहक भारतात खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण या ग्राहकांच्या आवडीनिवडी समजून घेणे आवश्यक आहे. ज्या ग्राहकासाठी आपण काम करणार आहोत, त्यांच्यासंदर्भात पूर्ण तपशील सुरुवातीलाच जाणून घेणे आवश्यक आहे. डिजिटल माध्यमांनी विश्वासार्हता कमावणे काळाची गरज आहे. जी माध्यमे विश्वासार्ह आहेत, त्यांनाच उत्पन्न मिळू शकते. ‘जसं आहे तसं’ लोकांपर्यंत पोहोचवता आले तर डिजिटल माध्यमांची विश्वासार्हता वाढेल. विश्वासार्हता वाढविण्याबरोबरच उत्पन्नासाठी डिजिटल माध्यमांत आशयाचे सातत्य खूपच गरजेचे आहे. सातत्य नसेल तर ग्राहक अन्य माध्यमांकडे वर्ग होऊ शकतो. आपला ग्राहक इतरांकडे जाणे म्हणजेच आपले उत्पन्नही वर्ग होण्यासारखे आहे. ग्राहकांना जपण्यासाठी रोज ताकदीचा आशय त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.