सामाजिक न्याय पर्व अंतर्गत महिला स्वयंसहायता बचत गटांसाठी कार्यशाळा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सामाजिक न्याय व इतर बहुजन कल्याण विभागांच्या योजनांची प्रचार प्रसिद्धी कार्यशाळा

कोल्हापूर : सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माहितीचा समाजामध्ये प्रचार व प्रसार व्हावा, तसेच सामाजिक न्याय विभागाच्या योजनांपासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी सामाजिक न्याय पर्व अभियान अंतर्गत 6 एप्रिल 2023 रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे सामाजिक न्याय व इतर बहुजन कल्याण विभागांच्या योजनांची प्रचार प्रसिद्धी कार्यशाळा पार पडली.

कार्यशाळेत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला स्वयंसहायता बचत गटाच्या 53 सदस्यांनी योजनांची माहिती घेतली. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी उपस्थितांशी संवाद साधून कल्याणकारी योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहचवावी व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी तालुका समन्वयक सचिन कांबळे, सुरेखा डवर व सचिन परब यांनी विद्यार्थ्यांना योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता पूनम पाटील यांनी महिला सक्षमीकरण विषयावर सुसंवाद साधून मागदर्शन केले. कार्यशाळेस सहाय्यक लेखा अधिकारी अरविंद रंगापुरे, कार्यालय अधिक्षक सचिन पाटील उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.