WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

WOMENS DAY-अर्जुन पुरस्कार विजेत्या अमृत महोत्सवी टेबल टेनिसपटू शैलजा साळोखे..

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

टेबल टेनिसमध्ये आंतरशालेय ते आंतरविद्यापीठ ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील विजेतेपदापर्यंतच्या टेबल टेनिसपटू म्हणून शैलजा साळोखे यांचं नाव आजही अग्रक्रमानं घेतलं जातं. अर्जुन पुरस्काराने सन्मानित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या महिला टेबल टेनिसपटू म्हणून त्यांचं विशेष कौतुक केलं जातं. नुकताच त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा झाला. वयाची 75 वर्षे पूर्ण केलेली असतानादेखील खेळाप्रति असलेल्या आत्मियतेपोटी कोल्हापूरसह अन्य भागातील खेळाडूंना टेबल टेनिसचे धडे देतानाचा त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे… सर्वसामान्य कुटूंबात जन्माला येवून देखील जिद्द, कठोर परिश्रम आणि सरावातील सातत्याच्या जोरावर आंतराष्ट्रीय स्तरावर देशाचं नावलौकिक करणाऱ्या प्रतिभावान टेबल टेनिसपटू शैलजा साळोखे यांच्याशी जागतिक महिला दिनानिमित्त केलेली बातचीत त्यांच्याच शब्दांत..

टेबल टेनिसची प्रेरणा –
मी 10-12 वर्षांची असताना म्हणजेच 1960 च्या दशकात मुली रस्त्यावरच खेळ खेळत असत. त्या काळी मुलींना खेळण्यासाठी किंवा नोकरीसाठी फारसं बाहेर पाठवले जात नसे. मी शाळेत शिकत असताना आझाद चौकातील रविवार पेठेतील घर ते ताराराणी विद्यालय मला चालत जावं लागत असे त्यामुळे दररोज 4-5 किलोमीटर चालण्याचा व्यायाम होत होता. माझे वडील पांडुरंग साळोखे उत्कृष्ट फुटबॉलपटू होते. आम्ही तिन्ही बहिणींनी नियमित खेळ खेळावा यासाठी वडिल आग्रही होते. वडिलांना फुटबॉलसह टेनिस व टेबल टेनिसचीही आवड होती. त्यामुळे त्यांनी घरातच टेबल टेनिसचे टेबल तयार करुन घेतले. वडील हेच माझे पहिले मार्गदर्शक आणि गुरु होते. रोज सायंकाळी ते तासभर सराव करुन घेत असत. टप्प्या-टप्प्याने सरावाचे तास वाढत गेले.

शाळा आणि राजारामियन क्लबमधील प्रोत्साहन – ताराराणी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असताना संस्थापक व्ही.टी. पाटील सरांनी शाळेच्या लायब्ररीतच लाकडी टेबल तयार करुन घेतलं. शिवाय दररोज सराव होण्यसाठी विशेष प्रयत्न केले. तत्कालिन मुख्याध्यापक श्री. अय्यर सर माझ्याकडून सराव करुन घेत असत. याचदरम्यान खासबाग मैदाना जवळील राजारामियन क्लबमध्ये टेबल टेनिस आणि अन्य खेळ खेळण्यासाठी त्या काळातील नामवंत व्यक्ती येत असल्याचं कळलं. त्यामुळं माझी पावलं या क्लबकडे वळली. या ठिकाणी एका टेबलवर 36 खेळाडू खेळत होते त्यामुळं माझा राऊंड यायला तास, दीड तास वाट पहावी लागत होती. परंतु, खेळाची आवड असल्यामुळं खेळ खेळूनच मी घरी परतत असे.

कारकिर्द-

*इंदूर (1974), अलाहाबाद (1976), उदयपूर ( 1979 ) मध्ये झालेल्या स्पर्धेत राष्ट्रीय चॅम्पियनशिप…

* यू. एस. ए. कॅनडाला भेट दिलेल्या भारतीय महिला टेबल टेनिसच्या संघाचे नेतृत्व. महिला डबल्सला कांस्यपदक
(1974-75)

* ग्वेर्नसेसी (यु.के.) येथे कॉमन वेल्थ टूर्नामेंटमध्ये भारतीय महिला टेबल टेनिस संघाचे नेतृत्व. महिला एकेरीतही कांस्यपदक.. महिला डबल्स मध्ये कांस्यपदक (1977)

*एडिनबर्ग (स्कॉटलंड) येथे झालेल्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धांमध्ये सहभाग.. महिला संघाला कांस्यपदक
महिला डबल्सला कांस्यपदक (1979)

*”महाराष्ट्र गावराव पुरस्कार” ने सन्मानित (1990)

*जपानमधील आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झालेल्या भारतीय ज्युनियर मुले आणि मुलींच्या टेबल टेनिस
संघाच्या प्रशिक्षक (1983)

* भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) नामांकित (1996-98)

*शिवाजी विद्यापीठ क्रीडा मंडळाच्या सदस्य (1998 ते आजपर्यंत)

*कोल्हापूर भूषण पुरस्कार 2003 ने सन्मानित

सध्या टेबल टेनिसमधील खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरु आहे.

गुरु व मार्गदर्शक- कोल्हापुरात राजारामियन क्लबमध्ये बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाचा सराव सुरु झाला. वडीलांशिवाय बाबा भोसले हेच माझे गुरु राहिले. अनेक सामन्यांतील यशामुळं तरुण वर्गामध्ये टेबल टेनिसबद्दल रुची निर्माण झाली आणि अनेक मुले-मुली टेबल टेनिसकडे वळू लागल्या. मी खेळाडू म्हणून घडण्यामध्ये माझ्या वडिलांप्रमाणेच बाबा भोसले आणि उद्योजक मदनमोहन लोहिया यांचाही वाटा महत्वाचा आहे. मदनमोहन लोहिया हे कोल्हापुरात दरवर्षी टेबल टेनिसच्या किमान सहा-सात स्पर्धांचे आयोजन करत असत. या स्पर्धांमध्ये विविध राज्यांतील खेळाडू सहभागी होत असत. यामुळे राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचा खेळ पाहणं आणि त्यांच्यासोबत खेळण्याची संधी मला मिळाली. यातूनच खेळाडू म्हणून माझी जडणघडण आणि विकास होत गेला.

सरावात सातत्य-
शाळेत शिकत असताना आंतरशालेय क्रीडा स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. पण मणिपूर, आसामला एकटी मुलगी कशी जाणार या विचारांनी माझी संधी हुकली. पण खेळाचा सराव सुरुच होता.

मदन मोहन लोहिया यांना खेळ, संगीत, नाटक, सामाजिक कार्याची आवड होती. त्यांनी विविध खेळांचे सामने भरवले होते. 1963 ते 66 च्या दरम्यान झालेल्या स्पर्धांमध्ये अनेक राज्यांचे खेळाडू सहभागी होत होते. या स्पर्धा आंतर जिल्हा स्पर्धा असल्या तरी अनेक राज्यातील खेळाडू या स्पर्धांत सहभागी होत होते. त्यामुळे इतर खेळाडूंचा खेळ पाहण्याची आणि त्यांच्या सोबत खेळण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर आपल्यातील क्षमता आणि उणीवांची जाणीव झाली. पहिला परदेश दौरा- भारत-चीन लढाईनंतर या दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंध सुधारण्याच्या हेतुने चीनमधील पेकींगला (सध्याचे बिजिंग) टेबल टेनिसची भारताची टीम पाठवण्यात आली. यात माझाही सहभाग होता. हाच माझा पहिला परदेश दौरा होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हा दौरा यशस्वी होण्यासाठी काटेकोर नियोजन केलं होतं.. या स्पर्धेत यश मिळाल्यानंतर कोल्हापूरच्या लोकांनी खूप कौतुक केलं. इथूनच टेबल टेनिसच्या प्रवासालाही खऱ्या अर्थानं सुरुवात झाली.

  1. श्री शिवछत्रपती पुरस्कार- टेबल टेनिस मध्ये तीन वेळा महिलांचे राज्यस्तरीय विजेतेपद मिळालं.. विविध स्पर्धांमधील प्राविण्य पाहून सन 1972-73 च्या दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तत्कालीन राज्यपाल अली यावर जंग यांच्या हस्ते श्री शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राज्य शासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या या पुरस्कारामुळं मनोबल तर वाढलंच त्याचबरोबर टेबल टेनिसमध्ये देशाचं नावलौकिक करण्याची जिद्द निर्माण झाली आणि त्यासाठी सराव वाढत गेला.
  2. अर्जुन पुरस्काराने सन्मान- भारत-चीन लढाईनंतर या देशातील मैत्रीपूर्ण संबंध सुधारण्याच्या हेतुने सन 1971 मध्ये मैत्री मोहिमेवर चीनला भेट देणाऱ्या भारतीय महिला टेबल टेनिस संघामध्ये माझी निवड झाली. हा माझ्यासाठी अत्युच्च आनंदाचा क्षण होता.

चीनमधील पेकिंग (बिजिंग) येथे जगभरातील 32 संघांनी प्रतिनिधीत्व केलं. या सामन्यात चौथा क्रमांक पटकावून कास्यंपदक जिंकता आलं. तसेच सन 1974 मध्ये अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही मी भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं. 1975 मध्ये मेलबर्न येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्यपदक जिंकता आले. यावेळी माझ्यासोबत दिल्लीच्या खेळाडू इंदू पुरी सहभागी झाल्या होत्या. भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये मिळालेले ते पहिले पदक. भारताला ऑल इंडिया चॅम्पियनशिप तीन वेळा मिळाली. अखिल भारतीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारच्या वतीने सन 1978 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा माझ्या आयुष्यातील सर्वात बहुमोल सन्मान होय..

खेळाडूंना आवाहन – खेळाचा नियमित सराव करा, मन शांत ठेवून ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. स्वत:शी प्रामाणिक रहा. ध्येय गाठायची जिद्द असेल तर अपार कष्ट करा. दिवसातून कमीत कमी 4 ते 6 तास सराव करा. त्यासाठी झोकून द्या. सर्वस्व पणाला लावा.. आयुष्यात कितीही संकटं आली तरी न डगमगता धैर्यानं सामोरं जा. विजयश्री मिळेपर्यंत प्रयत्नात सातत्य ठेवा.. यश तुमच्याच हाती..!

रेल्वे विभागात नोकरी-
टेबल टेनिसमध्ये एव्हाना माझं नाव चांगलंच परिचित झालं होतं. दक्षिण मध्य रेल्वे विभागासाठी टेबल टेनिस खेळाडूची आवश्यकता होती. यासाठी रेल्वेचे सरव्यवस्थापक इथल्या स्टेशन मास्तरांसह घरी आले. रेल्वे‍ विभागात माझी आवश्यकता असल्याचं त्यांनी वडीलांना पटवून दिले. त्या काळात रेल्वे विभागात नोकरीला मुलीला कसं पाठवायचं या काळजीपोटी वडीलांनी त्यांच्यासमोर बऱ्याचशा अटी मांडल्या. कोल्हापुरातच नोकरी करता येईल आणि खेळण्यासाठी कधीही परवानगी असेल अशा अटींवर मला रेल्वेत नोकरी करण्याची संधी मिळाली. याच दरम्यान झेकोस्लोव्हाकीयामधील प्लाझान येथे 1978 मध्ये झालेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय रेल्वे संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत महिला संघाने सुवर्ण पदक मिळवून विश्वविजेतेपद पटकावले. यानंतर रेल्वे बोर्डाने ‘इंडियन रेल्वे मिनिस्ट्री ॲवॉर्ड’ने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

अडचणींवर मात –
टेबल टेनिसमध्ये अनेक सामन्यात यश मिळवत असताना काही अडचणींनाही सामोरं जावं लागलं. पण, संकटांना न डगमगता सरावात सातत्य ठेवलं. कारण वडिलांची खंबीर साथ मला होती. परंतु, सन 1970 मध्ये माझ्या सख्ख्या भावाचं निधन झालं तेव्हा मात्र वडील पूर्णपणे खचून गेले. वडिलांना या दुख:तून बाहेर काढणं गरजेचं होतं. भावाच्या निधनानंतर हे दु:ख बाजूला सारुन 14 व्या दिवशीच मी वडीलांसह टेबल टेनिसच्या स्पर्धेसाठी बाहेर पडले. केरळ मधील मुन्नारमध्ये झालेल्या या दक्षिण विभागीय स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवून ही विजयश्री वडीलांना अर्पण केली.

विशेष साैजन्यः शब्दांकन: वृषाली पाटील

माहिती अधिकारी जिल्हा माहिती कार्यालय कोल्हापूर

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.