अफगाणिस्तानबाबत दिल्लीत भारत आणि मध्य आशिया संयुक्त कार्यकारी समुहाची पहिली बैठक झाली. या बैठकीत भारत देश चाबहार बंदरामार्गे अफगाणिस्तानला २० हजार मेट्रिक टन गहू पाठवणार आहे अशी घोषणा करण्यात आली. मंगळवारी झालेल्या या बैठकीत युद्धात उद्ध्वस्त झालेल्या आणि आत्ता असलेल्या अफगाणिस्तानच्या अवस्थेबाबत सखोल चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
भारत प्रतिनिधीत्व करत असलेल्या बैठकीत २० हजार मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानला पाठवण्याचा मह्त्तवाचा निर्णय झाला आहे. याआधी अफगाणिस्तानात जी परिस्थिती निर्माण झाली होती ती पाहता मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यातही ५० हजार मेट्रिक टन गहू पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केला होता. त्यावेळी तिथे लोकांना मदतीची अपेक्षा होती. सामान्य माणसांपुढे खाण्याचीही भ्रांत होती त्या अनुषंगाने हा निर्णय घेतला गेला होता. |
मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात अफगाणिस्तानातील महिलांच्या विद्यापीठातील शिक्षणावर प्रतिबंध घालण्यात आले. तालिबानच्या या निर्णयाचा भारतासह अनेक देशांनी निषेध नोंदवला होता. या सगळ्याची चर्चाही मंगळवारच्या बैठकीत करण्यात आली. तसंच दहशतवाद, कट्टरतावाद तसंच मादक पदार्थांची तस्करी आणि त्याचे जगावर होणारे धोकादायक परिणाम यावरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.