विनायक जितकर
कोल्हापूर राज्यात आदर्शवत करू – आमदार जयश्री जाधव
कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर शहराच्या विविध भागात ६० लाख रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन शहराच्या विविध समस्यावर अधिवेशनात आवाज उठवला आहे. त्यासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जास्तीत जास्त निधी खेचून आणून कोल्हापूर शहरातील सर्व विकासकामे पूर्ण करू आणि कोल्हापूर शहर राज्यात आदर्शवत करू अशी ग्वाही आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी दिली.
आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून शहराच्या विविध भागात सुमारे ६० लाख रुपये निधीच्या विकास कामाचे उद्घाटन आज करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
आज प्रभाग क्रमांक २७ ट्रेझरी ऑफिस अंतर्गत मुजावर घर ते बागवान घर पॅसेज काँक्रिटीकरण करणे या विकास कामासाठी ३ लाख ५० हजार रूपये व प्रभाग क्रमांक २७ ट्रेझरी ऑफिस अंतर्गत अकबर मोहल्ला येथे पॅसेज कॉक्रीटीकरण करणे ७ लाख रुपये, टाऊन हॉल बागेत अंतर्गत पॅसेज कॉक्रीटीकरण करणे १० लाख रुपये, प्रभाग क्रमांक ४८ तटाकडील तालीम अंतर्गत दयावान ग्रुप (कमान) ते महाकाली मंदिर रस्ता तसेच लाड घर ते नवरंग प्रेस रस्ता डांबरीकरण करण्यासाठी ८ लाख ७६ हजार रुपये निधी आणि प्रभाग क्रमांक ४९ रंकाळा स्टॅन्ड अंतर्गत रंकाळा वेश स्टॅन्ड ते हिंग वॉशिंग कंपनी ते ताराबाई रोड रस्ता खडीकरण, डांबरीकरण करण्यासाठी १३ लाख ७० हजार रूपये, प्रभाग क्रमांक ३० खोलखंडोबा अंतर्गत डांबरीकरण, काँक्रीटीकरण व गटर्स करण्यासाठी १६ लाख रुपये या विकासकामाचे उद्घाटन केले.
यावेळी माजी नगरसेवक रियाज सुभेदार, माजी नगरसेवक रमेश पोवार, माजी नगरसेवक लता कदम, अनिल पाटील, माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, माजी नगरसेवक दिलीप माने, माजी नगरसेवक धनाजी आमते, अनिल पाटील, निशिकांत मेथे, इंद्रजीत आडूरे, मोहन सरवणकर, चंदा बेलेकर, बाळासाहेब कंद्रे, करण शिंदे, अमित जाधव, सुदर्शन सावंत, शिरीष करंबे, संपत चव्हाण, उदय पवार, मेहजनबी सुभेदार, शिवाजी जाधव, रितेश रोटे, सविता सनक्की, राहुल कुलकर्णी, ओंकार ओतारी, शिवाजीराव जाधव, चंद्रकांत कंद्रे, सचिन जानवाडकर, अभय कुलकर्णी, विजय कंद्रे, महेश सनक्की, आण्णा रोटे, कौस्तुभ बोरगावकर, शंकर खोंद्रे, हाजी ओतारी, नाना बोरगावकर, किशोर उत्तुरे, ज्येष्ठ नागरिक विलासराव साळोखे, संपत चव्हाण- पाटील, किशोर आयरेकर, गणेश चव्हाण, रणजीत आयरेकर, बाजीराव चव्हाण, नारायण सुतार, संजय शिंदे, शैलेश चव्हाण, विजय शिंदे, रामचंद्र सुतार, राजू शिंदे, प्रताप देसाई, धनाजी दळवी, मधुकर पाटील, निवेदिता पाटील, स्मिता जाधव, पिंट्या लाड, समीक्षा पाटील यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.