चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटणाच्या दृष्टीने विकसित झाले पाहिजे आणि पर्यटन वाढायला पाहिजे
शित्तूर – वारुण (तालुका – शाहूवाडी) परिसरातील उदगिरी पैकी केदारलिंग वाडीतील वयस्कर शेतकरी बंडू फिरंगे यांच्यावर झालेला गव्याचा प्राणघातक हल्ला, दोन महिन्यापूर्वी शाळकरी मुलीचा बिबटयाच्या हल्ल्यात झालेला मृत्यू, उखळूच्या शाळकरी मुलावर बिबटयाने केलेला प्राणघातक हल्ला, मागील वर्षी सर्जेराव पाटील यांच्यावर गव्याने केलेला प्राणघातक हल्ला अशा मानवप्राण्यावरील घटना तसेंच शेतकऱ्याच्या शेळ्या, मेंढया, गाई, म्हैशी यांचा चांदोली अभयारण्यातील हिंस्त्र जंगली श्वापदाच्या हल्ल्यात झालेला मृत्यू असे घटनाचक्र गेली काही दिवस सातत्याने चालू आहे.
पण त्यावर ठोस उपाय – योजना करण्यात संबधीत विभाग अजूनही सकारात्मक आणि गांभीर्यपूर्वक असल्याचे दिसत नाही. चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटणाच्या दृष्टीने विकसित झाले पाहिजे, पर्यटन वाढायला पाहिजे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही, पण त्यांचबरोबर इथला स्थानिकही जगला पाहिजे हे पण वास्तव आहे आणि सत्य आहे. पण हे वास्तव आणि सत्य स्वीकारण्याचं धारिष्ठ वनविभाग आणि संबधीत अधिकारी स्वीकारण्याबाबत का उदासीन आहेत? हा एक चिंतनीय प्रश्न आहे.