मोटार वाहन कायद्यातील कलम 129 व 194 मधील हेल्मेट वापरासंबंधी तरतुदींची अंमलबजावणी करणेबाबत मागणी…
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात सन 2022 व 2023 मध्ये घडलेल्या अपघातांचे तुलनात्मक विश्लेषण केले असता, या वर्षामध्ये घडलेल्या एकूण रस्ते अपघातांमध्ये दुचाकी व पादचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दसून आले. सदर अपघातांमध्ये 70 ते 80 टक्के अपघात हे फक्त दुचाकी व पादचाऱ्यांचे आहेत ही बाब रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिशय चिंताजनक आहे.
वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. व बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे हे हेल्मेट शिवाय प्रवास करणारे असतात असे दिसून आले आहे. त्यामुळे हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणी विषयक व्यापक मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात राबवण्यात येत आहे.मोटर वाहन कायदा 1988 कलम 194 ड मधील तरतुदीनुसार हेल्मेट वापरासंबंधी तरतुदीचा भंग करणाऱ्या अथवा समाज संमती देणाऱ्या व्यक्तीस दंडाची तरतूद आहे.
उपरोक्त कलम 194 ड अन्वये विना हेल्मेट मोटार सायकल चालविणे किंवा चालविण्यास संमती देणे अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली असून त्यांना दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे कलम 194 ड मधील तरतूदीनुसार आपणांस सूचित करण्यात येते की, आपल्या कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवास करणाऱ्यांस प्रतिबंध करावा, तसेच आपणास असे सूचित करण्यात येते की, 194 च्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून आपल्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून अशा बिना हेल्मेट दुचाकीवर येणाऱ्यांची यादी आपणास कार्यालयात सादर करावी. जेणेकरून मोटार वाहन कायद्यातील विहीत तरतुदीनुसार सबंधीतांवर कारवाई करणेत येईल अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी दिली.