वृक्षांना वडिलांसारखी साथ, आणि पर्यावरणाला मातेसारखी माया – योग सेवा फाउंडेशनचं हिरवंगार कार्य”

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

“वृक्षांना वडिलांसारखी साथ, आणि पर्यावरणाला मातेसारखी माया – योग सेवा फाउंडेशनचं हिरवंगार कार्य”

पेठवडगाव (रुपेश आठवले):
‘निसर्गाशी मैत्री म्हणजेच खरं जीवनयोग’ हा मंत्र जपणाऱ्या योग सेवा फाउंडेशनने गेल्या चार वर्षांत जे कार्य उभं केलं आहे, ते केवळ वृक्षारोपण न राहता एक हरित चळवळ ठरली आहे. पेठवडगाव येथील महालक्ष्मी देवराई, या भोड्या माळावर तब्बल १७.५ एकर वनविभागाच्या जमिनीत ५,००० देशी झाडांची लागवड केली आहे.

या हरित चळवळीमागे आहे निस्वार्थी सेवा, सातत्य आणि पर्यावरणप्रेमाची शुद्ध भावना. करंज, वड, लिंब, अर्जुन, बेल, फणस, सागवान, पिंपळ, शिकेकाई अशा अनेक आयुर्वेदिक व दुर्मिळ देशी वृक्षांनी आज या मातीत आपली मुळे घट्ट रोवली आहेत.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

पाण्याची टंचाई, पण इच्छाशक्तीला मर्यादा नाही!

पहिल्या तीन वर्षांत पाण्याची कोणतीही शासकीय सोय उपलब्ध नसताना नागरिकांनी स्वतःच्या वाढदिवस, पुण्यतिथी, वर्धापन दिन या निमित्ताने टँकरने पाणी पुरवले. रविवारी सुट्टीच्या दिवशी स्वतःहून नागरिक आले, “हे झाड आपलं आहे” या भावनेने पाणी घातलं.

 

सकाळी दोन तास, रोजचं हरित तप!

फाउंडेशनचे सदस्य – डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, सरकारी कर्मचारी, निवृत्त फौजी – प्रत्येकाने सकाळी दोन तास झाडांसाठी दिले. कोणतंही मोबदला न घेता, निसर्गसेवेचं व्रत घेतलं.

प्रकल्प 2019: सिद्धोबा डोंगरावर 2,000 झाडं

सादळे-मादळे येथील सिद्धोबा डोंगरावर देखील २,००० वृक्ष लावण्यात आले. वडगाव-कोल्हापूर रोड, भादोळे रोड आणि महालक्ष्मी तलाव परिसरातही वृक्षारोपण करून ‘ग्रीन वडगाव, क्लीन वडगाव’ हा संदेश दिला.

राष्ट्रीय गौरव – गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्याकडून सत्कार

या कार्याची दखल आर्ट ऑफ लिविंग, बेंगळुरू येथे घेण्यात आली. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते योग सेवा फाउंडेशनचा सन्मान करण्यात आला. ही केवळ संस्था नाही, हे एक हरित राष्ट्रसेवकांचं कुटुंब आहे.

ही आहेत हिरव्या लढ्याचे खरे हिरो –

अध्यक्ष – राजेंद्र जाधव, सचिव – महेश्वर पाटील, ज्येष्ठ सदस्य – होनोले अण्णा, उपाध्ये काका, कुलकर्णी काका, शहाजी इंगळे, अभिजीत बेलेकर, मोहन माळी, संतोष सनगर, मेजर समीर जाधव (नि. फौजी), नितीन कुचेकर, राहुल काळे, योगेश कुंभार, अभिजीत सुतार आणि अनेक सेवाव्रती…
त्यांना साथ लाभते डी. एस. घुगरे सर, आर्ट ऑफ लिविंग पेठवडगाव, आदर्श विद्यालय गुरुकुल मिनचे आणि ग्रीन व्हॅली स्कूल मिनचे यांची.

 

Positive Watch चा संदेश –
“झाडं लावणं ही सेवा आहे, पण झाडांना जपणं ही साधना आहे!”
जय निसर्ग, जय पर्यावरण, जय माणुसकी

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.