नेत्रसंपदा जपण्यासाठी सामाजिक उपक्रम; विक्रमनगर ख्रिस्ती चर्चमध्ये मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात चष्मे वाटप
कोल्हापूर –माणुसकीच्या दृष्टिकोनातून आणि आरोग्याची जाणीव जागवण्यासाठी विक्रमनगर ख्रिस्ती समाज ख्रिश्चन चर्च, कोल्हापूर येथे आज मोफत नेत्र तपासणी शिबिर व अल्प दरात चष्मे वाटप उपक्रम राबवण्यात आला.
जतन फाउंडेशन व ख्रिस्ती जनसेवा संघ, बेडकीहाळ यांच्या सहकार्याने ‘नंदादीप नेत्रालय’ तर्फे आयोजित या शिबिरात तब्बल २८५ नागरिकांनी सहभाग घेत आपली नेत्र तपासणी करून घेतली. काहींना मोफत तर काहींना सवलतीच्या दरात आवश्यक चष्मे देण्यात आले.
या उपक्रमाचे उद्घाटन रेव्ह. सजय आघामकर, संजय धनवडे, के.सी.सी.चे कार्यकारी चिटणीस दिनानाथ कदम, संदीप वाघमारे, अजित रणवरे, शांतिजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत चौगुले, शारोण घाटगे, डेव्हिड फर्नांडिस, शलतीयल वाघमारे, पा. अमोल कदम, अमोल मदाळे, नितीन शिंदे, पेत्रस शिंदे, डॉक्टर सुपर्णा, योगेश पाटील, विक्रम पंडे आणि डॉक्टर सूर्यकांत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दृष्टी हीच दिशा या भावनेतून राबवलेल्या या उपक्रमातून अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला व गरजू लोकांना नवदृष्टी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता.
ही सामाजिक जाणिव पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.