एसआयआर अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 99.94 काम पूर्ण-शीतल तेली-उगले

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

बिनचूक मतदान पद्धतीबाबत मतदार जनजागृती करा
– विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

– एसआयआर कामकाज, पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा घेतला आढावा

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

कोल्हापूरTEAM WATCH : अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 99.94 टक्के मतदार हे अंतिम यादीमध्ये वर्ग करण्याची कार्यवाही पूर्ण झाली असून, उर्वरित कामास गती देऊन प्रलंबित कामकाज त्वरित पूर्ण करावे. मतदारांनी बिनचूक मतदान कसे करावे यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत जनजागृती करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक तथा निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिले.

कोल्हापूर जिल्ह्यातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेंतर्गत कामकाज तसेच महाराष्ट्र विधानपरिषद पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय राठोड, अतिरिक्त आयुक्त महसूल डॉ. स्वाती देशमुख, अपर जिल्हाधिकारी अजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी महसूल संपत खिलारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी उपस्थित होते.

शितल तेली उगले म्हणाल्या, अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे हे लक्षात घेऊन एसआयआर च्या कामाला प्राधान्य द्या व ते 25 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करा. त्यासाठी प्रतिदिन उद्दिष्ट ठरवून काम करा तहसीलदारांनी यामध्ये सातत्याने आढावा घ्यावा आणि बीएलओ सह सर्व यंत्रणा गतिमान कराव्यात.नावे व गळण्याची प्रक्रिया करत असताना एआरओंनी प्रकरण परत्वे स्वतः पाहून निर्णय घ्यावा अत्यंत काळजीपूर्वक तपासणी करावी. फॉर्म सहा सात आणि आठ याविषयीचे कामकाजही तातडीने निपटारा करावे. मतदार याद्यांची प्रिंटिंग काळजीपूर्वक होईल याची दक्षता घ्यावी, यामध्ये नावांच्या कोणत्याही चुका झाल्यास संबंधितांवर कारवाई होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण प्रक्रिया निर्धारित वेळेत आणि पारदर्शकपणे पूर्ण करावी.18 वर्षावरील सर्व नवं मतदारांची नोंदणी होईल यादृष्टीने स्विप उपक्रमांतर्गत जनजागृती करावी. जेंझीला समजेल अपील होईल अशा भाषेत जनजागृती चे साहित्य तयार करावे.तसेच महाराष्ट्र विधानपरिषद पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतदार यादीत नाव शोधणे व योग्य रीतीने मतदान कसे करावे याबाबत अधिकाधिक जनजागृती करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिले.

  • भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ही मुदत 12 ऑक्टोबरपर्यंत निश्चित करण्यात आली होती. सुधारित कार्यक्रमानुसार दावे व हरकती दाखल करण्याची प्रक्रिया 26 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून, प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रक्रियेतील कामकाजादरम्यान येणाऱ्या अडचणींचे निराकरण करून निर्धारित वेळापत्रकापूर्वी आणि अचूकतेने पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या.

विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले म्हणाल्या, मतदार यादीच्या शुद्धीकरणाच्या दृष्टीने एसआयआर प्रक्रिया महत्त्वाची असून, या प्रक्रियेत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचे काम प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावरील कामकाजावर नियमित देखरेख ठेवावी. तसेच मतदार नोंदींची पडताळणी, मॅपिंग आणि अर्जांचा निपटारा यामध्ये अचूकता राखून निर्धारित वेळेत काम पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), पर्यवेक्षक तसेच बूथ लेव्हल एजंट (BLA) यांच्या नियुक्त्या आणि पुनरीक्षण प्रक्रियेतील विविध कामांच्या प्रगतीचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतदार जनजागृती कराया बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील निवडणूकपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.यावेळी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतदार यादीत नाव कसे शोधायचे तसेच, वैध मतदानाची योग्य पद्धत याविषयी सर्व माध्यमांतून मतदार जनजागृती करावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.