WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कोल्हापूर जिल्ह्यातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करूया: संजयसिंह चव्हाण

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करुन जिल्ह्यात क्षयरोग विजय दिवस साजरा होण्यासाठी प्रयत्न करुया मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करुन 24 मार्च हा दिवस क्षयरोग विजय दिवस म्हणून साजरा होण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शाहू स्मारक भवन येथील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रख्यात मधुमेह तज्ज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. चंद्रकांत कणसे, डॉ. सरस्वती कणसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. बी. थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय राजवीर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या टीबी ऍण्ड चेस्ट विभाग प्रमुख डॉ.अनिता सैब्बनावार, माहिती अधिकारी वृषाली पाटील, डॉ.मानसी कदम, डॉ. विनायक भोई, डॉ. मोहन पोतदार, दीपा शिपुरकर, डॉ. नितीन कुंभार तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

सन 2019 च्या पूरपरिस्थितीत डॉ. कणसे यांनी केलेल्या मदत कार्याबद्दल त्यांना श्री चव्हाण यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. क्षयरोग निर्मूलनात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, क्षयरोग पथक टी.यु. (तालुका युनिट) राधानगरी – प्रथम क्रमांक, टी.यु.गारगोटी – द्वितीय क्रमांक, टी.यु.गगनबावडा – तृतीय क्रमांक, उत्कृष्ट ग्रामीण रुग्णालय – मलकापूर, उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र – तारळे, क्षयरोग निर्मुलन प्रीमियम लीग – २०२३ विजेता – कोल्हापूर ग्रामीण, उत्कृष्ट खाजगी वैद्यकिय व्यावसायिक – कुरडे चिल्ड्रन्स हॉस्पिटल- प्रथम क्रमांक जयसिंगपूर, श्री. स्वामी समर्थ हॉस्पीटल, इचलकरंजी – द्वितीय क्रमांक, चौधरी हॉस्पिटल, जयसिंगपूर – तृतीय क्रमांक, उत्कृष्ट खाजगी औषध विक्रते (व्यावसायिक) महादेव मेडिकल इचलकरंजी, क्षयरोग जनजागृतीपर आशा स्वयंसेविका वक्तृत्व स्पर्धा -२०२३ अनुराधा रणधीर ढेरे, प्रा. आ. केंद्र कडगाव (ता.भुदरगड)- प्रथम क्रमांक, सीमा शरद पाटील, प्रा. आ. केंद्र घालवाड (ता.शिरोळ)- द्वितीय क्रमांक, भाग्यश्री हरीश कांबळे प्रा. आ. केंद्र हेर्ले – तृतीय क्रमांक, क्षयरोग जनजागृतीपर आरोग्य कर्मचारी यांच्या म्हणी व घोषवाक्य स्पर्धा-२०२३ एस. आर. कांबळे (एम.पी.डब्लू.) प्रा. आ. केंद्र शिरोली पुलाची – प्रथम क्रमांक, मनीषा शंकर कुंभार (ए.एन.एम.), पुशिरे प्रा. आ. केंद्र पडळ -द्वितीय क्रमांक, संदीप मनोहर सरंजामे (एम.पी.डब्लू.), शेड्शाळ, प्रा. आ. केंद्र. नृसिंहवाडी – तृतीय क्रमांक, समुदाय आरोग्य अधिकारी (सी.एच.ओ.) यांची “क्षयरोग जनजागृतीपर पोस्टर स्पर्धा”-२०२३ सपना माने – यळगुड प्रा. आ. केंद्र हुपरी- प्रथम क्रमांक. डॉ. विनिता जाधव – कसबा बीड, प्रा. आ. केंद्र माळ्याची शिरोली – द्वितीय क्रमांक. डॉ. निकिता मोहोले – करंबळी प्रा. आ. केंद्र.-कडगाव – तृतीय क्रमांक, रोहन भावके – वेतवडे प्रा. आ. केंद्र. कळे – तृतीय क्रमांक (विभागून) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण म्हणाले, क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी निक्षय मित्र बनण्यासाठी पुढे यावे. समाजात विविध घटकांनी समाजातील इतर खर्च वाचवून निक्षय मित्र बनून रुग्णांना मदत करावी. क्षयरोग लपवून ठेवणे हा सुध्दा एक गुन्हा असून वेळीच तपासणी करुन मोफत उपचार घ्यावा.

प्रमुख पाहुणे डॉ. चंद्रकांत कणसे म्हणाले, क्षयरुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठीचा आहार द्यायला हवा. क्षयरुग्णांनी भरपूर सूर्यप्रकाश घ्यावा. दररोजच्या आहारात प्रोटीनचा समावेश करावा. यात अंडी, पनीर, म्हैशीचे किंवा गायीचे दूध, ताक यांचा अधिक वापर करा. साखरेचे प्रमाण कमी करा, असा सल्ला डॉ. कणसे यांनी दिला.

जिल्हा क्षयरोग आधिकारी डॉ . उषा कुंभार प्रास्ताविकात म्हणाल्या, महान शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक यांनी २४ मार्च १९८२ मध्ये बर्लिन विदयापीठात क्षयरोग टिबीसाठी कारणीभूत मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलोसिस जीवाणू शोधून काढला व त्याची माहिती लोकांसमोर जाहीर केली. या शोधामुळे क्षयरोगाचे निदान आणि उपचार करण्यासाठीचा मार्ग सोपा झाला. त्यामुळे २४ मार्च हा दिवस जागतिक क्षययरोग दिन साजरा केला जातो. २०१५ मध्ये एक लाख लोकसंख्यमागे कोल्हापूर ग्रामीण मध्ये ८६ केसेस होत्या. त्या २०२५ मध्ये ४२ पर्यंत कमी करण्याचा उद्देश आहे. तर २०१५ मध्ये ४.२ मृत्युदर होता, तो आता एक लाख लोकसंख्येमागे 3 इतका कमी झाला आहे. टी.पी.टी. एकुण इग्रा टेस्ट – १३४ एकुण इग्रा पॉझिटिव्ह – १२ (टी.पी.टी. साठी पात्र) एकुण निक्षय मित्र – ११० व एकुण जोडलेले पेशंट – ८४३ आहेत. यावर्षीची थीम – “होय! आपण टी.बी.संपवू शकतो” ही आहे. २०२२ मध्ये शासकीय १९७७ तर खासगी रुग्णालयात ७२३ असे एकुण २ हजार ९७९ रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती डॉ. उषा कुंभार यांनी दिली. सुरुवातीला डॉ.अनिता सैबन्नावर यांनी उपस्थितांना क्षयरोग जनजागृतीपर शपथ दिली. नयना सावंत व ज्ञानदेव सावंत यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. भोई यांनी आभार मानले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.