तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
जी. जी. पाटील… शिराळा
शिराळा तालुक्यातील पश्चिम विभागातील डोंगरपठारावरील चांदोली राष्ट्रीय उद्यानालगत असणा-या खुंदलापूर धनगरवाडा येथील बयाबाई गावडे या वारकरी आजीचे वय शंभरीकडे आलेले.तरीही पंढरीच्या विठूरायाची ओढ कायम असल्याने कार्तिक एकादशीनिमित्त वारीतीतून पाटण तालुक्यातील वाल्मिक ते पंढरपूर पायी दिंडीतून
नियमित जाते.
पण सध्या जास्त चालता येत नसल्याने एसटीने पंढरपूर ला जाण्यासाठी सोनवडेत पंधरा वीस किलोमीटर पायपीट करून येते व तेथील वारकरी लोकाबरोबर पंढरपूर ला जाते.पंढरपूर च्या विठूरायाची भेट घेतल्याशिवाय माझ नाही समाधान होत अस सारखच ती म्हणते.म्हणून तर न विसरता कुणी आठवण न न करता हमखास कार्तिक एकादशीनिमित्त ती पंढरपूर ला जायला निघतेच.अशिक्षित, लिहिता वाचता येत नाही.तरीही कित्येक अभंग आजही तोंडपाठ आहेत.घरातून निघाल्यावर स्वरचित व काही पारंपरिक अभंग गात पंढरपूर पर्यंत जाते.या याज्जीचे कौतुक करावे तेवढे थोडेच. ही शाहुवाडी तालुक्यातील राघूचा धनगर वाडा येथील आहे.शंभरी पार केलेली आज्जी आजही सनादिवशी गावोगावी चालत जावून मागून खाते.स्वता पाणी आणते डोंगरकपारीतील झ-यातून.
आश्विनी अशोक बोभाटे यांनी देखिल असेच हालाकीचे दिवस काढत. संसार करत, आहे त्वया परिस्थितीला ताेंड देत, आपल्या जीवनात यशस्वी वाटचाल केलेली आहे. आला दिवस आनंदात राहणे हे 63 वर्षिय आश्विनी अशाेक बाेभाटे यांना माहिती. त्यामुळे दरवर्षी येणारा महिला दिनाचे इतकं महत्व त्यांंना नसले तरी, राेजच आमचा दिवस कष्टाचा, आनंदाचा आणि हसत खेळत राहण्याचा असं त्या म्हणतात. जुनी सातवी झालेल्या आश्विनी या लग्नानंतर सुखी आनंदी जीवन जगत आहेत. कावळा नाका येथे चिरमुरे-शेंगदाणे आणि चणे विक्रीचा व्यवसाय आहे. पती अशाेक बाेभाटे यांच्याच व्यवसायात हातभार लावण्याचा निश्चय करत त्यांनी व्यवसायाकेड लक्ष देत, दाेघांनी मिळून, दाेन मुलं. दाेन मुलींची लग्न लावून दिल्यानंतर नातवंडा साेबत दिवस छान सुरु असल्याचे ते सांगतात. पती अशाेक यांची मिळालेली बहुमूल्य साथ, यामुळेच आजपर्यंत सुखी संसाराची वाटचाल सुरु आहे. घरकाम, व्यवसाय आणि आपलं कुटुंब व परिचित लाेकांचा आपलेणा हा आमच्या जीवनाचा मूलमंत्र असे आश्विनी बाेभाटे म्हणाल्या.
या सर्व जिगरबाज महिलांना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.