द एलिफंट व्हिस्पर्स हा सर्वोत्कृष्ट माहितीपट ..ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला या तीन श्रेणींमध्ये नामांकन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

चित्रपटसृष्टीतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या 95 व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यंदाच्या सोहळा भारतासाठी खूप खास ठरला. ऑस्कर 2023 साठी ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नामांकन मिळाले होते. हा पुरस्कार आरआरआरने आपल्या नावावर केला आहे. ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

भारताला पहिल्यांदाच नाटू नाटूमुळे या श्रेणीत ऑस्कर मिळाला आहे. या सोहळ्यात अनेक संस्मरणीय क्षण पाहायला मिळाले. नाटू नाटूला ऑस्कर जाहीर झाल्यानंतर दीपिका पदुकोण भावूक झालेली दिसली. तिचे डोळे पाणावले होते. तर आरआरआरचे दिग्दर्शक राजामौली थिएटरमध्ये सर्वात मागे बसलेले दिसले.

द एलिफंट व्हिस्पर्स हा सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट ठरला. तर ऑल दॅट ब्रीथ्स ही डॉक्युमेंटरी फीचर फिल्म या शर्यतीतून बाहेर पडली आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला या तीन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.