विनायक जितकर
विरोधी पक्षाच्या आमदारांना शून्य टक्के निधी देणे हा बजेटमध्ये झालेला अत्यंत दुर्दैवी निर्णय…
कोल्हापूर – राज्यात आज अनेक शाळा सुरू झाल्या. मात्र, अद्याप शिक्षक भरती सुरू नाहीये. प्रोत्साहन पर अनुदानाचा विषय असेल किंवा शिक्षक भरतीचा असेल अशा पद्धतीचे अनेक विषय ज्यांना बगल देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. काही प्रश्नांची उत्तर द्यायचे नाहीत असे शासनाने ठरवले आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर केला आहे.
दरम्यान सतेज पाटील पुढे बोलताना म्हणाले की, विरोधी पक्षाच्या आमदारांना शून्य टक्के निधी देणे हा बजेट मध्ये झालेला अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. राज्याच्या इतिहासात असे कधीही झालेले नाही, सत्ताधाऱ्यांच्या आमदारांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. सध्या चे सरकार हे केवळ 200 मतदार संघातील सरकार असल्यासारखे वाटत आहे. सरकारकडून सत्ताधाऱ्यांना 100 टक्के झुकता आणि विरोधकांना शून्य टक्के असे सुरू आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रच आहोत. आम्ही सर्वजण या प्रश्नांना वाचा फोडण्याच प्रयत्न करत आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसावर खोचक टोला दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या कोल्हापूरच्या जनतेच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो. मात्र, मुख्यमंत्री होण्याचा निर्णय हा येथे होत नाही तर दिल्लीमध्ये होतो, दिल्लीच्या मनात काय आहे यावर सर्व गोष्टी ठरतात असे म्हणत दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांच्या बर्थडेला भावी मुख्यमंत्री म्हणून झळकलेल्या बॅनरवर सतेज पाटील यांचा खोचक टोला लगावला आहे. |
सतेज पाटील म्हणाले की, कर्नाटकमध्ये निवडणूक होऊन 3 महिने झाले तरी भाजपला अद्याप विरोधी पक्ष नेता देता आला नाही. ते आमच्यावर टीका करत आहेत, त्यांची तेथील परिस्थिती काय हे त्यांनी पाहायला हवे. या आठवड्यात काँग्रेसचा विरोधी पक्षनेता कोण असेल हे ठरणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस एकसंघ फूट पडणार नाही. आमदार सतेज पाटील म्हणाले की, राज्यात आणि देशात अविश्वासाचा राजकारण सुरू आहे. सर्वसामान्यांच्या मनामध्ये विश्वासाचे वातावरण हे काँग्रेसच देऊ शकते, भारत जोडोच्या माध्यमातून राहुल गांधी हे सर्व सामान्याचे नेतृत्व असल्याचेसमोर आले आहे. काँग्रेस एकसंघ असून काँग्रेसमध्ये फूट पडणार नाही असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.