विनायक जितकर
शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्यासमवेत बजरंग दलाचे पदाधिकारी…
कोल्हापूर – विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची प्रांत बैठक नुकतीच पुणे येथे झाली. यामध्ये कोल्हापूर जिल्हा संयोजकपदी पराग फडणीस, तर शहर संयोजकपदी अक्षय ओतारी यांची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा मंत्री सुधीर जोशी- वंदूरकर पत्रकाद्वारे दिली.
निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवार पेठ शंकराचार्य मठाचे पीठाधीश श्री विद्यानृसिंह भारती यांचे आशीर्वाद घेतले. नूतन निवडीमध्ये सहमंत्रिपदी अनिल दिंडे, उपाध्यक्षपदी श्वेता कुलकर्णी, मातृशक्ती संयोजिकापदी अश्विनी ढेरे, मीरा हणमसागर, शहर दुर्गावाहिनी संयोजिकापदी श्रद्धा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रथमेश मोरे उपस्थित होते.
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.