नवीन ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅक टर्बो ब्ल्यू, ग्लेशियर व्हाइट, क्रोनोस ग्रे, मिथोस ब्लॅक आणि नवेरा ब्ल्यू या या पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. ऑडी इंडिया वेबसाइट (www.audi.in) आणि ‘मायऑडी कनेक्ट’ अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन बुक करता येऊ शकते.
ही सेगमेंटमधील पहिली कॉम्पॅक्ट कूपे क्रॉसओव्हर आहे. या कारच्या एक्स्टीरिअर फीचर्समध्ये एलईडी हेडलाइट्ससह एलईडी रिअर कॉम्बीनेशन लॅम्प्स, पॅनोरॅमिक ग्लास सनरूफ, कम्फर्ट की सह गेस्चर-कंट्रोल्ड टेलगेट, 5 स्पोक व्ही स्टाइल ‘एस डिझाइन’ आर 18 अलॉई व्हील्स आणि हाय ग्लॉस स्टायलिंग पॅकेज आदींचा समावेश आहे. तसेच इंटीरिअर फीचर्समध्ये ऑडी व्हर्च्युअल कॉकपीट प्लस, एमएमआय नेव्हिगेशन प्लस सह एमएमआय टच, ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट, ऑडी फोन बॉक्स सह वायरलेस चार्जिंग, 2-झोन क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्ससह फोर-वे लंबर सपोर्ट, अॅम्बियण्ट लायटिंग पॅकेज प्लस आणि ऑडी साऊंड सिस्टम दिलीय.
जर्मन लक्झरी कार उत्पादक ऑडीने आज भारतात ऑल-न्यू ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅकसाठी बुकिंग सुरु केली आहे. नवीन ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅक स्पोर्टी आणि आकर्षक आहे. स्टँडर्ड म्हणून क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्हसह सुसज्ज ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅकमध्ये 2.0 लिटर टीएफएसआय पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 190 एचपी पॉवर आणि 320 एनएम टॉर्क जनरेट करते. ग्राहक नवीन ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅक 2 लाख रूपयांच्या टोकन रक्कमसह बुक बुक करू शकता.