शोभा सोमणाचे आणि रेश्मा पाटील यांची निवड…
महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी अनगोळ येथील नगरसेविका शोभा सोमनाचे तर शाहू नगरच्या नगरसेविका रेश्मा पाटील यांची नावे निवड करण्यात आले आहे. दोघीही नगरसेविकांनी नामांकन दाखल केले आहे. भाजप कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत महापौर उपमहापौर उमेदवार अंतिम करण्यावर सविस्तर चर्चा झाली असून त्या बैठकीत शोभा सोमाणाचे यांची महापौर तर रेश्मा पाटील यांची उपमहापौर पदी निवड करण्याचे शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती निदर्शनास आली आहे. दोन्ही उमेदवारांनी सकाळीच नामांकन केले असून दुपारी तीन वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.महापौर पदासाठी काँग्रेसने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्याने महापौर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे तर उपमहापौर पदासाठी रेश्मा पाटील आणि समितीच्या वैशाली भातकांडे यांच्यात निवडणूक होऊ शकते. सत्तारूढ गट नेते पदी राजू डोणी यांची भाजप कोअर कमिटीने निवड केली असल्याचे समोर येत आहे.
बेळगाव (Belgaum) महानगरपालिका निवडणूक होऊन नगरसेवक निवडून आल्यावर तब्बल चौदा महिन्यांनी महापौर आणि उप महापौर निवडणूक घेण्यात आली.महापौर निवडणुकीसाठी विरोधी पक्षातील नगरसेवकांनी अर्ज दाखल केला नाही त्यामुळे शोभा सोमणाचे यांची बिनविरोध निवड झाली.
उप महापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजप (BJP) तर्फे रेश्मा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर समितीतर्फे वैशाली भातकांडे यांनी अर्ज दाखल केला होता.रेश्मा पाटील यांना 42 मते तर वैशाली भातकांडे यांना चार मते मिळाली. निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित असलेले प्रादेशिक आयुक्त एम.जी.हिरेमठ यांनी महापौर आणि उप महापौर निवडणुकीचा निकाल जाहीर केला.