शिराळा प्रतिनिधी (जी.जी.पाटील)
औरंगाबाद येथील बोधी ट्री एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने राज्यातील १५ शिक्षकांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीरझाला असून सदर पुरस्कारासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वि.मं.शिराळे वारूण शाळेतील पदवीधर अध्यापक ,उपक्रमशील शिक्षक ,संवेदनशील कवी गोविंद शांताराम देसाई यांची निवड झाली आहे.शैक्षणिक,सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता त्याचे वितरण औरंगाबाद येथे झाले.
त्यांना यापूर्वी शैक्षणिक व्यासपीठाचा राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार आसरा, मानव व माहिती अधिकार कोल्हापूर यांचा पद्मपुष्प आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.जीवन गौरव राज्यस्तरीय कविता व चारोळी लेखन स्पर्धेत त्यांच्या कविता अनेकवेळा प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या आहेत.एक शीघ्र कवी,उत्कृष्ट काष्ठशिल्पकार,सामाजिक कामात आग्रही सहभाग,आदर्श विद्यार्थीप्रिय शिक्षक असा जिल्ह्यात त्यांचा नावलौकिक आहे.जीवन गौरवच्या सातव्या वर्धापन दिनी औरंगाबाद येथे एम.जी.एम.युनिव्हर्सिटीच्या कॕम्पसमध्ये सदर पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला.
यावेळी शिक्षण सह संचालक अनिल साबळे,बोधी ट्री फौंडेशनचे संस्थापक रामदास वाघमारे,सिनेअभिनेत्री प्रतिक्षा शिवणकर,जीवनगौरव परिवारातील सदस्य उपस्थित होते, कार्यक्रम भव्यदिव्य पार पाडण्यासाठी बोधी ट्री एज्युकेशन फाउंडेशन व जीवनगौरव मासिक औरंगाबादचे संस्थापक रामदासजी वाघमारेजी यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.