मुंबई- शरद पवारांच्या वतीने प्राप्त निवेदनात राजीनाम्यावर भाष्य करण्यात आले आहे. त्यात पवार यांनी नमूद केले की, मी जर सर्वांना विश्वासात घेवून राजीनाम्याचा निर्णय घेतला असता तर तो पक्षातील नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मान्यच झाला नसता त्यामुळे मी हा निर्णय कुणाला कळवला नव्हता, असे निवेदन नमूद करण्यात आले आहे.
शरद पवारांतर्फे सांगण्यात आले की, आपण जी समिती गठीत केली त्यात राष्ट्रवादीचे प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. त्यांची समिती माझ्या राजीनाम्याबाबत बैठक घेवून निर्णय घेणार आहे. परंतु, 6 मे रोजीची बैठक 5 मे रोजीच घ्यावी. समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल.
शरद पवार म्हणाले, लोकांना धक्का बसला आहे, मोठा नेता गेल्यानंतर जसे वातावरण होते तसे वातावरण झाले आहे. मलाही या निर्णयाचा खूप मोठा धक्का बसलाय, लोक रडत आहेत. लोकांना हा धक्का पचेना. आत्तापासूनच लोक राजीनामेदेत आहेत. मी घरचीच आहे. पण त्यांच्यावर अत्यांतिक प्रेम करणारे लोक आहेत. त्यांच्यापासून साथीदार दुरावले पण ते डगमगले नाही.
सरोज पाटील म्हणाल्या, इडीचे संकट असतानाही व देशातील वातावरण पाहता त्यांची खूप गरज आज आहे. या पदावर त्यांनी राहावे असे वाटते. कितीही टीका करा त्यांनी कधीही त्यांनी वाईट शब्दात उत्तर दिले नाही. सुसंस्कृत व्यक्तिमत्व ते आहेत. अशा व्यक्तिमत्वाने राजीनामा देणे दुखःद आहे.
![]() |