शिराळा (जी.जी.पाटील)
शिराळा तालुक्याचा पश्चिम भागातील कुसळेवाडी येथील वारणा डाव्या कालव्यावरील पुल बुधवार दि.१५ रोजी सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान कोसळला आहे.कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.परंतु याच पुलाच्या दुरुस्तीचे काम व्हावे.म्हणुन गेल्या दहा वर्षापासुन कुसळेवाडी ग्रामपंचायत पञ व्यवहार करत आहे.परंतु त्यांच्या पञ व्यवहाराला प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचे ग्रामस्थातुन बोलले जात आहे.
शेवटी आज पुल पडला.तरी देखील प्रशासन गप्प बसुन असल्याचे दिसत आहे.दुर्दैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.अशी प्रतिक्रीया ग्रामस्थातुन बोलली जात आहे.कुसळेवाडी हे गाव एक हजार लोकवस्तीचे गाव आहे.गावाजवळुन बारमाही वाहणारा वारणा डावा कालवा गेला आहे.गावची नव्वद टक्के शेतजमीन तसेच दहा कुटुंब देखील पुलाच्या पलीकडे रहात आहेत.त्यामुळे याच पुलावरुन दिवसा राञी नेहमी वर्दळ सुरु असते.
कुसळेवाडी येथील वारणा डाव्या कालव्यावरील पुल कोसळला.गेल्या दहा वर्षापासुन ग्रामपंचायतीने लेखी पञव्यवहार करुन देखील प्रशासनाचे दुर्लक्ष
कुसळेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकृष्ण कुसळे,उपसरपंच वसंत नाईक तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी आतापर्यत प्रशासनाला पञव्यवहार केला.परंतु त्याची दखल प्रशासनाने आजपर्यंत घेतली नाही.प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे हा पुल पडला असल्याचे स्थानिक ग्रामस्थातुन बोलले जात आहे.घडलेल्या घटनेमुळे ग्रामस्थातुन चिड निर्माण होत आहे.प्रशासन याकडे लक्ष घालणार का? असा सवाल सर्व सामांन्यातुन व्यक्त होताना दिसत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, जास्त उत्पादन घ्या- मानसिंगराव नाईक