स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई गांजाच्या 75 झाडांसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त…
कोल्हापूर – जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ इथ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून तब्बल साडे सात लाखांचा गांजा जप्त केलाय. याप्रकरणी हेब्बाळ येथील विष्णू सर्जाप्पा पिरापगोळ उर्फ कांबळे आणि काशाप्पा विष्णू पिरापगोळ उर्फ कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्या बापलेकांची नावे आहेत. सध्या हे दोघेही पसार झाले आहेत.
पिरापगोळ पित्रपुत्रांनी आपल्या शेतातील उसाच्या फडात गांजाची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने पिरापगोळ यांच्या शेतात छापा टाकला असता 7 ते 8 फूट उंचीची 75 गांजाची झाडे आढळून आली. याठिकाणी पोलीसांनी १०७ किलो ४०० ग्रॅम वजनाचा ७ लाख ५७ हजार ५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल कवळेकर यांच्यासह पोलिस पथकाने ही कारवाई केलीय.