मानसिक आरोग्यासाठी टेलिमानस हेल्पलाईनवर कॉल करा
कोल्हापूर:सध्या विविध आजारांवर अनेक उपचार आहे. शासन आपल्या परीने अनेक याेजना देखिल राबवित आहे. वास्तिवक पाहता आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात अनेकजण असंख्य विवंचेने त्रासले आहेत.. आर्थिक, नाेकरी, सामाजिक, तसेच घरगुती कारणामुळे कित्येक लाेकांचे मानसिक स्वास्थ बिघडू शकते. यात काहीजण उपचार करून घेतात तर काही जण उपचार काय करायचे, काेणाला भेटायचे, कुणाचे मार्गदर्शन घ्यायचे म्हणून विचार करत बसतात. मात्र आता चिंता नकाे.. शासन आपल्या दारीच जणू काही तुम्हाला टेन्शन फ्री साठी आलेय असे म्हणायला काहीच हरकत नाही. घरबसल्या तुमच्यावर आता उपचार हाेतील. मार्गदर्शन मिळेल. त्यासाठी तुम्हाला फक्त हेल्पलाईनवर काँल करायचे आहे, आणि मार्गदर्शन घ्यावयाचे आहेत. तर मग आता चिंता नका.. करा तर हेल्पलाईनवर काँल.
केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने ‘टेली मेंटल हेल्थ असिस्टन्स अँड नेटवर्किंग ॲक्रॉस स्टेटस’ (टेली-मानस) उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. घरबसल्या या सेवेचा उपयोग घ्यावयाचा असल्यास टेलिमानस हेल्पलाईन 14416 वर कॉल करण्याचे आवाहन सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उमेश कदम यांनी केले आहे.
- राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम हा कक्ष सेवा रुग्णालय, कसबा बावडा, येथे कार्यरत
- मानसिक आजार असलेल्या रुग्णांवर उपचार, समुपदेशन व मोफत औषधोपचार
- टेली मानस हा या कार्यक्रमाचा एक भाग आहे. घरबसल्या या सेवेचा उपयोग करु शकता.
- हेल्पलाइन नंबर 14416 वर कॉल करुन मानसिक आजारांविषयी माहिती द्या
- (उदासिनता, काळजी, स्किझोफेनिया, मुड डिसऑर्डर, आत्महत्या, व्यसन, मत्सर, स्ट्रेस, नैराश्य, न्युनगंड, वैफल्य तसेच भीती, हिंसा, ताण, चिंता, अस्थिरता,असुरक्षितता ची सविस्तर माहिती
- अशी माहिती सेवा रुग्णालय कसबा बावडा, कोल्हापूर येथे मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत मानसोपचार विभागात देण्यात येते.
केव्हा संपर्क साधू शकता. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम – सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर ओपीडी सोमवार, बुधवार व शनिवार तर बाह्यओपीडी / क्षेत्रभेटीचे दिवस मंगळवार, गुरुवार व शुक्रवार याप्रमाणे आहेत.