तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषदेत जिल्ह्यातील ऊसवाहतूकदारांच्या फसवणुकी बाबत प्रश्न उपस्थित…
कोल्हापूर – जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांकडून लाखो रुपये अॅडव्हान्स घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर काय कारवाई करण्यात आली असा सवाल विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत ६७१ गुन्हे दाखल झाल्याचे सांगितले.
आमदार सतेज पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषदेत जिल्ह्यातील ऊसवाहतूकदारांच्या फसवणुकी बाबत प्रश्न उपस्थित केला. कोल्हापूर जिल्हा हा उस उत्पादनात आघाडीवर आहे. येथील लोकांचे अर्थकारण उसावर अवलंबून आहे. मात्र या जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांकडून मुकादमांनी लाखो रुपये अॅडव्हान्स घेतले आहेत. या उस वाहतूकदारांची कोट्यवधीची फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत शासनाने काय कारवाई केली असा प्रश्न आमदार पाटील यांनी केला.
या प्रश्नावर उत्तर देताना सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात वाहतूकदारांच्या फसवणुकीचे 671 गुन्हे नोंद झाल्याचे सांगितले. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उस गाळपा अभावी शिल्लक राहिलेला नसल्याचे त्यानी स्पष्ट केले.