रंगभूमीवरील जेष्ठ कलाकार ,तंत्रज्ञ आणि बॅकस्टेज कलाकारांचा अशोक सराफ यांच्या वतीने कृतज्ञता सन्मान सोहळा..!
मुंबई – नटश्रेष्ठ अशोक सराफ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठी रंगभूमीवरील जेष्ठ कलाकार, तंत्रज्ञ आणि बॅकस्टेज कलाकारांचा अशोक सराफ यांच्या वतीने कृतज्ञता सन्मान सोहळा होणार आहे. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ काळ योगदान देणारे कलावंत, तंत्रज्ञ पडद्यामागे राहून साथ देणारे बॅकस्टेज कलाकार यांचे रंगभूमीच्या हितासाठी भरीव योगदान असते.
आपल्या वयाच्या पंच्यात्तरीतही रंगभूमीवर कार्यरत राहून नटश्रेष्ठ अशोक सराफ आपले महत्वपूर्ण योगदान देताहेत, मायबाप रसिक प्रेक्षकांचा अखंड मिळणारा प्रतिसाद जितका महत्वपूर्ण आहे. तिथकेच महत्वपूर्ण आहेत रंगभूमीवर प्रदीर्घ योगदान देणारे रंगकर्मी यापैकी निवडक २० जणांचा कृतज्ञता सन्मान करण्याची भावना या सन्मानामागे असल्याचे अशोक सराफ यांचे बंधू सुभाष सराफ यांनी सांगितले.
हा सोहळा शनिवार दि २९ जुलै रोजी शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. अशोक सराफ, निवेदिता सराफ, सुभाष सराफ आयोजित या कार्यक्रमाला ग्रंथालीचे सहकार्य आहे. यावेळी सरस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, एस. व्ही. सी. बँकेचे अध्यक्ष दुर्गेश चंदावरकर, अल्कोन इंटरप्राईजेस चे अनिल खवटे, डॉ. संजय पैठणकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. |
याचबरोबर नाट्यसंगीताची मैफल होणार आहे. यामध्ये मानसी फडके – केळकर, श्रीरंग भावे सहभागी होणार असून याची संहिता अरुण जोशी यांची असून सूत्रसंचालन अजून परचुरे व डॉ. मृण्मयी भजक करणार आहेत.