येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी(मल्टिस्टेट शेड्युल्ड) बँकेची सन 2022-22 ते 2027-28 सालची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोल्हापूर विभाग सहकारी संस्थांचे सहनिबंधक अरुण काकडे यांनी सोमवारी बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत केली. तर त्यानंतर झालेल्या नुतन संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेच्या चेअरमनपदी स्वप्निल प्रकाश आवाडे आणि व्हाईस चेअरमनपदी संजयकुमार शेषाप्पा अनिगोळ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेची सन 2022-23 ते 2027-28 सालासाठी संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. एकूण 18 जागांसाठी ही निवडणूक होती. सर्व प्रक्रियेनंतर 18 जागांसाठी तितकेच अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या संदर्भातील घोषणा सोमवारी बँकच्या नुतन इमारतीत संपन्न विशेष सभेत करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोल्हापूर विभाग सहकारी संस्थांचे उपनिबंधक अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बँकेचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, डॉ. राहुल आवाडे, प्रकाश दत्तवाडे, बाबासो चौगुले आदींसह मान्यवर उपस्थित होते.
85 योजनांचा आमदारांनी घेतला आढावा, काेट्यवधी रुपये मंजूर
नुतन संचालक मंडळात सर्वसाधारण गटात स्वप्निल प्रकाश आवाडे, संजयकुमार शेषाप्पा अनिगोळ, चंद्रकांत भाऊसाहेब चौगुले, बंडोपंत ईश्वरा लाड, महेश सदाशिव सातपुते, रमेश बापू पाटील, श्रीशैल शंकरराव कित्तुरे, बाळकृष्ण तातोबा पोवळे, द्वारकाधिश लक्ष्मीनारायण सारडा, शैलेश शंकरराव गोरे, सुभाष बापूसो जाधव, शहाजहान गुलाबहुसेन शिरगांवे, महिला गटात सौ. प्रेमलता रविंद्र पाटील, सौ. आक्काताई अशोक आरगे, अनुसूचित जाती गटात अविनाश गुलचंद कांबळे, महाराष्ट्र राज्य गटात बाबुराव दत्तु पाटील, तात्यासो सुरेंद्र अथणे व कर्नाटक राज्य गटात सचिन किरण केस्ते यांचा समावेश आहे. निवडीनंतर हजाराे उपस्थित जनसमुदायाने नूनत संचालकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. फटाक्यांच्या आतषबाजीत सर्वांचे अभिनंदन करत निवडीचा जल्लाेष साजरा करण्यात आला.
सर्व नूतन संचालक मंडळाचे POSITIVVE WATCH TEAM कडून अभिनंंदन, पुढील वाटचालीस शुभेच्छा