पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
|

गारगोटी — बिद्री कारखान्याचे माजी संचालक, हुतात्मा स्वामी सुतगिरणीचे विद्यमान संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भुदरगड तालुक्यातील प्रमुख नेते निवासराव देसाई यांनी आपल्या अनेक सहकारी कार्यकर्त्यांसह बिद्री कारखान्याच्या निवडणूकीत राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीस पाठिंबा दिला. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांनी त्यांचे स्वागत केले.
| प्रा.सयाजीराव देसाई म्हणाले की, बिद्री कारखान्याचा लौकिक वाढविण्यासाठी कार्यक्षेत्रातील सभासदांचा मोलाचा वाटा आहे. पण के.पी.पाटील माझ्या मुळेच कारखान्याचा लौकिक वाढला आहे असे सांगत सुटले आहेत. गेले अनेक वर्षे निवडणूकीच्या तोंडावर सभासदांना म्हणायचे तुम्हीच कारखान्याचे मालक आणि निवडून आल्यानंतर मीच एकटा कारखान्याचा मालक अशी त्यांची नीती आहे. त्यांची ही फसवेगिरीची निती सर्वांना कळली आहे म्हणूनच त्यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून अनेक संचालक परिवर्तन आघाडीत समावेश झाले आहेत. त्यामुळे बिद्रीत परिवर्तन अटळ आहे असे प्रतिपादन निवासराव देसाई यांनी केले. |
 |
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की, लै भारीची टिमकी वाजविणाऱ्या के.पी.पाटील यांनी सभासदांच्या हितासाठी कोणत्या कल्याणकारी योजना राबविल्या हे सांगावे. ऊस तोडणी कार्यक्रमांचा अनेक वेळा फज्जा उडाला. यामुळे शेतकरी बांधवांचा ऊस वाळल्याने कार्यक्षेत्रातील अनेक सेंटर आँफीसला टाळे ठोकण्याची वेळ सभासदांवर आली म्हणूनच सामान्य ऊस उत्पादक सभासदांच्या जीवनात नंदनवन फुलविण्यासाठी आणि सभासदच मालक होण्यासाठी बिद्रीत परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
के.पी.पाटील यांना धक्यावर धक्के
के.पी.पाटील हे कारखाना लै भारी चालवले असे सांगत आहेत मात्र या निवडणूकीत त्यांचे कारखान्यातील संचालक, अत्यंत जवळचे प्रमुख नेते व प्रमुख कार्यकर्ते त्यांच्या एकाधिकारशाहीच्चा कारभारास कंटाळून त्यांना सोडून राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीस पाठिंबा देत आहेत. यातून के.पी.पाटील यांच्या लै भारी कारभाराची प्रचिती शेतकरी बांधवांना समजत आहे. |
 |

यावेळी निवासराव देसाई (आण्णाजी), बाळासाहेब देसाई, दत्तात्रय भोसले, हरीदास देसाई, शरदराव देसाई, तुकाराम गुरव, युवानेते विरेंद्र देसाई, मोहन पाटील, तानाजी जाधव, दत्तात्रय आरेकर, मधुकर आरेकर, विठ्ठल देसाई, नेताजी पाटील, चंद्रकांत देसाई, दिपक देसाई, संजय मोहिते यांच्यासह प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

|
|
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.
Post Views: 1,432