आरोग्य क्षेत्रातील कार्याबददल सुधीर बंडगर यांचा सत्कार
शिराळा ( जी.जी.पाटील )
आरोग्य क्षेत्रातील कार्य व कोरोना संकट काळात केलेल्या कार्याबद्दल सुधीर रामचंद्र बंडगर यांचा शासकीय जिल्हा आरोग्य विभाग सांगली व आरळा ग्रामस्थ यांच्या वतीने मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
गांधी सेवाधाम विद्यालय आरळा ( ता. शिराळा ) येथील शिक्षक व विद्यालयाचे आरोग्य विभाग प्रमुख सुधीर रामचंद्र बंडगर यांनी आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्याबददल अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मा. विवेक पाटील , शिराळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मा. प्रविण पाटील ,उपसरपंच राजेश सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार संपन्न झाला. यावेळी मणदुरचे वेद्यकीय अधिकारी डॉ. मनजित परब , डॉ नंदकुमार गवारी उपस्थित होते.
कोरोना राष्ट्रीय आपत्ती संकट काळात सुधीर बंडगर यांनी डोंगरी, जंगल , दुर्गम भागात राहणाऱ्या 250 विद्यार्थी व बांधवाना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या अरसेनिक अल्बम या होमीओपॅथीक गोळ्या व मास्कचे वाटप केले होते.डोंगरी , दुर्गम भागातील विठलाईवाडा ( ता. शाहुवाडी ) येथील दारिद्रयाच्या मरणकळा सोसत कॅन्सरशी झगडत शेवटच्या घटका मोजणाऱ्या बयाबाई वरक या माऊलीला औषध उपचार सुविधा करून प्राण वाचवले. व त्यासाठी जनसहभागातून 1 लाख 25000 रुपये , दर महिन्याला 800 रुपयाचा किराणा माल , पेशटंला खाट – गादी , चार पोती धान्य , कपडे , सायकल व घर बांधून देऊन वडीलांना मुकलेल्या चिमूकल्याना माऊली मिळवून दिली 5 वर्षानंतर आज अंथरुणाला खिळून असणारी माऊली खाऊन फिरुन चिमुकल्या सोबत नविन घरात आनंदाने राहत आहेत.पाटण तालुक्यातील जंगल भागातील मनोरुग्न असणाऱ्या महिलेस व उपासमारीची वेळ आलेल्या चिमुकल्याना डाळी , धान्य , कपडे देऊन सहकार्य केले आहे. गुढे येथील मोबाईल स्फोटात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांस उपचारासाठी मदत केली होती. कैलास करांडे ( इस्लामपूर ) या विद्यार्थ्यांच्या नाकाच्या ऑपरेशनसाठी मदत केली होती. येसलेवाडी ( ता. शिराळा ) येथील सर्पदंश झालेल्या विद्यार्थ्यांस रात्री 2 वाजता मिरज येथील शासकीय सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करून प्राण वाचवले. इस्लामपूर येथील श्रेयश वददी या विहीरीत बुडणाऱ्या विद्यार्थ्याचे प्राण वाचवले होते. विजेच्या शॉकने जखमी झालेल्या शिक्षकांस तात्काळ सेवा उपब्ध करून सेवा दिली. एड्स माहितीयुक्त गाव हा शासकीय उपक्रम आरळा येथे राबवण्यात पुढाकार व यशस्वी नियोजन करुन आरोग्य विभागास सहकार्य करून आरळा हे गाव एड्स माहितीयुक्त गाव बनवले. कोरोना संकट काळात माझे कुटूंब माझी जबाबदारी , चेक पोस्ट ड्युटी , कोरोना सर्व्हे , विद्यार्थी जनजागृती , आरोग्य प्रबोधन फेरी , हात धुवा उपक्रम रक्त तुटवडा काळात रक्तदान इत्यादी शासकीय उपक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. गांधी सेवाधाम विद्यालय, आरळा येथे आरोग्य विभाग प्रमुख म्हणून काम करत असताना गोवर – रुबेला लसीकरण मोहिम , हिवताप जनजागृती, धनुर्वात लसीकरण ,आरोग्य तपासणी मोहिम , व इतर अनेक शासकीय योजना व उपक्रम राबविण्यात पुढाकार व यशस्वी नियोजन केले आहे. शासनाच्या विविध योजना राबविण्यास आरोग्य विभागास सहकार्य केल्याबद्दल त्यांचा हा सत्कार करण्यात आला.