राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत शां.कृ.पंत वालावलकर हायस्कूलला रौप्य पदक
कोल्हापूरःआंतरभारती शिक्षण मंडळ संचलित मुक्त विद्यापीठांतर्गत शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलने नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेत १४ वर्षे मुले वयोगटात रौप्य पदक प्राप्त केले. सदर संघ वडगाव येथे संपन्न झालेल्या बेसबॉलच्या विभागीय स्पर्धेमध्ये विजेते पद घेऊन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.
खेळाडूःकर्णधार जय कुंभार,समर्थ जाधव,वेदांत चौगुले,बसवराज मुरगुड,नामदेव गावडे,केदार गायकवाड,स्वराज सागर,कृष्णा मुरगुड,चिन्मय चोकाकर,राधेय घाडगे,आर्यन फाले, सोहम दामुगडे , प्रेम पोवार, पाटील,हर्षवर्धन देसाई,मयुर अस्वले
या संघाला क्रीडाशिक्षक,राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे, मुख्याध्यापक सौ. वृषाली कुलकर्णी, उपमुख्याध्यापक मोरे सर, पर्यवेक्षक सुरगोंडा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेच्या कार्याध्यक्ष पल्लवी कोरगांवकर, सचिव मारूतराव पाटोळे राजेश वरक संतोष पोवार प्रशांत भोसले इंद्रायनी पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.