१० दिवसांत ४०० वाहनांवर कारवाई… ST ACTION मोड मध्ये!

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

एसटी बसस्थानक परिसरातील २०० मीटर ‘नो पार्किंग झोन’मध्ये धडक मोहीम; १० दिवसांत ४०० वाहनांवर कारवाई 

कोल्हापूर, WATCH TEAM : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कोल्हापूर विभागाने बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी १ जुलैपासून सुरू केलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. बसस्थानकांच्या २०० मीटर ‘नो पार्किंग झोन’मध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करत आतापर्यंत ४०० वाहनांवर कारवाई करून एकूण १ लाख ७८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

या मोहिमेत जिल्ह्यातील २५ बसस्थानकांची तपासणी करण्यात आली. सुरक्षा व दक्षता विभागाने पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविली. मोहिमेदरम्यान ७८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर बसस्थानक परिसरातील ३२२ वाहने हटविण्यात आली.
कोल्हापूर, रंकाळा, तावडे हॉटेल, वाठार, वडगाव, कोडोली, बांबवडे, जोतिबा, पन्हाळा, हातकणंगले, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, हुपरी, कागल, मुरगूड, गारगोटी, राधानगरी, मुधोळ तिट्टा, भोगावती, गडहिंग्लज आणि आजरा आदी बसस्थानक परिसरात ही कारवाई सातत्याने सुरू आहे.
कोल्हापूर विभाग नियंत्रक वृषाली भोसले व विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व दक्षता अधिकारी भानुदास मदने, सुरक्षा पर्यवेक्षक, आगार व्यवस्थापक तसेच वाहतूक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र पथकांनी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ही मोहीम राबविली.


या कारवाईमुळे बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली असून अशा वाहतुकीचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे. भविष्यातही ही मोहीम अधिक तीव्रतेने सुरू ठेवण्यात येणार असून प्रवाशांनी सुरक्षित आणि अधिकृत प्रवासासाठी एसटी सेवेचाच वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.