आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते काळम्मावाडी धरण क्षेत्रात जलपूजन…
राधानगरी – आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांची उपस्थितीत जलपूजन झाले. धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. यातूनच कोल्हापुराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला काळम्मावाडी येथील थेट पाईपलाईन योजनेच्या जॅकवेलमध्ये धरणातून पाणी पोहोचलं त्यामुळे कोल्हापूरला स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करण्याचे माझे स्वप्न पूर्णत्वास येत आहे. या योजनेच्या पूर्ततेमुळे आत्मिक समाधान लाभले असल्याची भावना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
आज आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील आमदार जयश्री जाधव महापालिकेचे जल अभियंता नेेत्रदिप सरनोबत यांच्यासह प्रकल्प अधिकारी आणि माजी नगरसेवकांनी काळम्मावाडी येथे जाऊन या योजनेची पाहणी केली. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं येत्या दोन महिन्यात उर्वरित तांत्रिक कामे पूर्ण होतील असं आमदार पाटील यांनी सांगितलं.
योजना पूर्ण क्षमतेने कार्यवाहीत होऊन कोल्हापूरला कायमस्वरूपी स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणार असल्याचेही यावेळी आमदार पाटील यांनी बोलले. यावेळी प्रकल्प अधिकारी राजेंद्र माळी माजी नगरसेवक सारंगधर देशमुख राजू लाटकर भोपाल शेटे मधुकर रामाने राजेंद्र साबळे सुनील पाटील संदीप कबाळे सचिन पाटील अश्फाक आजरेकर मोहन सालपे गोकुळचे संचालक राजेंद्र मोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.