विनायक जितकर
प्रा. रमेश ढावरे निवासी आश्रमशाळेमध्ये बी. ए. कोतवाल(सर) फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप
कोल्हापूर – जीवनात यश मिळवायचे असेल तर नेहमी कष्टाची तयारी ठेवा, असे प्रतिपादन पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे-जाधव यांनी केले. कुशीरे येथील प्रा. रमेश ढावरे निवासी आश्रमशाळेमध्ये बी. ए. कोतवाल(सर) फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. समीर कोतवाल यांच्या पुढाकाराने आणि प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम झाला.
शिंदे पुढे म्हणाल्या, जीवनात प्रगती करताना कितीही अडचणी आल्या तरी शिक्षणाची कास सोडू नका. ज्ञानाची ही पणती अखंडपणे तेवत ठेवा, तुम्हाला यश नक्की मिळेल. प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी सांगितले की, या आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या गरजू मुलांसाठी समाजातील दातृत्वाचे अनेक हात नक्की पुढे येतील.
डॉ. समीर कोतवाल यांनी कोतवाल फाउंडेशनच्या कामाची माहिती देत यापुढे ही असे उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक डी.बी.पाटील, प्राथमिकचे मुख्याध्यापक एक. के. म्हेतर, अधीक्षक व्ही. डी. पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.