विजय बकरे
भोगावती नदीकाठच्या गावांना दक्षता घेण्याचे आवहान…
राधानगरी प्रतिनिधी – राधानगरी धरण परिसरात गेले तीन दिवस पावसाने धुमाकूळ घातल्या असल्याने राधानगरी धरणाचे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. असल्याने भोगावती नदीकाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवहान भोगावती पाटबंधारे खात्याकडून करण्यात आले आहे.
राधानगरी धरण परिसरात ८८ मिलिमीटर पाऊस झाला असून राधानगरी धरणाची पाणी पातळी 307. 06 फूट व पाणीसाठा 2973.44 दशलक्ष घनफूट आहे. एक जून ते आठ जुलै अखेर 780 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 901 मिलिमीटर झाला होता. आज दुपारी बाराच्या दरम्यान राधानगरी धरणातून बीओटी पावर हाऊस मधून 700 क्यू सेस विसर्ग पाणी सोडण्यात आले आहे. अशी माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली.
काळम्मावाडी धरण परिसरात पावसात जोर वाढल्याने धरणामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असल्याने काळमवाडी धरण पंचवीस पॉईंट 41 टीएमसी पैकी 2.92% धरण भरले आहे.