WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

उल्लेखनीय सेवा ;विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना राष्ट्रपती पदक

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

गडचिरोली, चंद्रपूर नक्षलवादी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी

कोल्हापूर – कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. शासनसेवा बजावत असताना फुलारी यांनी आजवर विविध ठिकाणी उत्कृष्ट काम केले आहे. गडचिरोली, चंद्रपूर नक्षलवादी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नागपूर शहरात मोका व एमपीडीए कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करुन गंभीर गुन्ह्यांमध्ये घट घडवून उत्कृष्ट कामगिरी केली. सन २०२० मध्ये कोरोना महामारी दरम्यान कायद्याची कडक अंमलबजावणी करून मानवतेची सेवा केली.

कोल्हापूर, सातारा, मिरज, विशाळगड येथील जातीय संघर्ष, हिंसाचार, मराठा आरक्षणविषयक आंदोलनां दरम्यान समाजात तणावाची परिस्थिती उद्भवली असता जातीय सलोखा राखून सामाजिक शांतता राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना सातत्याने राबवून समाजामध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण केले, शांतता राखली. सामाजिक (Community) पोलिसिंग उपाययोजनांची अंमलबजावणी करून सेवा (S.E.V.A.) प्रकल्पासारख्या नाविन्यपूर्ण योजना दुर्बल घटकांच्या मदतीसाठी राबविल्या. कोल्हापूर शहरातील दंगल परिस्थिती, विशाळगड अतिक्रमण, पुसेसावळी औंध दंगल अशा दंगलसदृश्य परिस्थितीत जातीय घटनांमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कौशल्यपूर्ण मार्गाने व सुसंवादाने सर्व परिस्थिती स्वतः हाताळून शांतता निर्माण केली.

जातीय घटनांचे इतरत्र पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याकरीता कठोर कारवाई व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. परिणामी मिरज, कराड, बार्शी, अक्कलकोट, जुन्नर, दौंड, खेड, औंध या पूर्ण भागात शांतता कायम राहिली. नागपूर, जळगाव, सांगली, पुणे, नाशिक याठिकाणी कार्यरत असतांना गंभीर ‘व गुंतागंतीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे कार्य, सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यामध्ये त्यांचे कौशल्यपूर्ण कामकाज वाखाणण्याजोगे आहे. मोहल्ला समिती, शांतता समिती या माध्यमांद्वारे ‘सामाजिक सलोखा व शांतता कायम ठेवली.

लोकसभा, विधानसभा २०२४ निवडणुका हिंसाचारमुक्त पार पाडण्यासाठी काम केले. काटेकोरपणे निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणी केली. कोल्हापूर परिक्षेत्राला कर्नाटक आंतरराज्य सीमा आहे. समन्वय ठेवून व सीमावर्ती भागात तपासणी करून निवडणूक कालावधी दरम्यान कोणतीही अघटीत घटना घडणार नाही, याकरीता मार्गदर्शन केले. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया भयमुक्त व शांततेत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातून मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर प्रथम क्रमांकावर आहे.

  • पोलीसांबाबत सामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा, यासाठी कम्युनिटी पोलिसिंग योजना राबवून सर्व सण समारंभ उत्सव शांततेत व उत्साहात साजरे झाले. अल्पसंख्याक समाजाचे पदाधिकारी, मंडळ यांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून गणपती व ईद सणा दरम्यान विश्वासाचे वातावरण निर्माण केले. गणपती व ईद त्याचबरोबर इतर सर्व धार्मिक सण हे एकमेकांसोबत साजरे करण्याबाबत चालना देवून सामाजिक सलोखा राखला जाईल याबाबत प्रयत्न केले.

नवरात्रोत्सव, भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन, पंढरपूर वारी, लोकसभा,विधानसभा निवडणुक २०२४, मा. पंतप्रधान, मा.राष्ट्रपती व इतर व्हिव्हिआयपी मान्यवरांचे दौरे यांच्यासाठी सुरक्षा व संरक्षण व्यवस्था नियोजन व चोख व्यवस्थापन. मोर्चा, विविध आंदोलने यामध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी मोहल्ला समिती, शांतता कमिटी, महिला दक्षता समिती अशा विविध समित्यांच्या बैठका घेवून जनतेचा विश्वास वृध्दींगत केला. भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले.

  • वन्यजीव गुन्ह्यांत आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हेल मासा उलटीची तस्करी करणाऱ्या टोळींचा छडा लावून अंदाजे ४५ कोटींचा अवैध मुद्येमाल जप्त करून यशस्वीरित्या कार्यवाही व गुन्हेगारांवर वचक ठेवला. परिक्षेत्रात शरीर विषयक, मालाविरूद्ध, महिलांवरील अत्याचार, संपत्ती व आर्थिक विषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी Visible पोलीसींग, स्ट्रीट पेट्रोलिंग, रात्रग्रस्त व नाकाबंदी यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सतत राबविल्यामुळे गुन्हेगारांवर जरब बसविली. गुन्ह्यांचे प्रमाण घटले.

कोल्हापूर परिषदेचे विशेष पोलीस महानिरीक्षक  सुनील फुलारी साहेब यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला *वैशिष्ट्यपूर्ण सेवा केल्याबद्दल राष्ट्रपती पदक* जाहीर झाले.
तसेच सुनील फुलारी यांना सन *2013 ला गुणवत्ता पूर्ण सेवा केल्याबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक* मिळालेले होते.
अशा रीतीने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक  सुनील फुलारी  यांना एकूण 02 राष्ट्रपती पदक* मिळाले आहे..

पुणे शहरात आर्थिक गुन्हे शाखा व सायबर लॅब स्थापन करून आर्थिक व सायबर सुरक्षा वाढवली. महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये पोलीस उपनिरीक्षक,पोलीस उपअधीक्षक, परिविक्षाधीन भापोसे अधिकाऱ्यांचे दर्जेदार प्रशिक्षणासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. राज्य राखीव पोलीस दलामध्ये कर्मचाऱ्यांसाठी शस्त्र तपासणी, शस्त्रास्त्र साठा, निशाणेबाजी व क्रीडा कौशल्य विकासाकरीता योग्य प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले व योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळातील या भरीव योगदानामुळे राज्य राखीव पोलीस दलाला विजेता ट्रॉफी व चॅम्पीयनशीप देवून गौरविण्यात आले.मोटार परिवहन विभागात जुन्या वाहनांचे निर्लेखन, वाहनचालकांसाठी वाहन देखभाल दुरूस्ती प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, कार्यशाळा नुतनीकरण, अशी वैविध्यपूर्ण कौशल्य विकासासाठी कामगिरी करून मोटार परिवहन विभागाचे आधुनिकीकरण व संपूर्ण मोटार परिवहन वाहतूक विभागाचे कामकाज गतीमान केले.

कोल्हापूर परिक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे व शिरोळ पोलीस ठाणे हे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून २०२४ साठी घोषित झाले. कोल्हापूर पुणे परिक्षेत्रामधील नवीन पोलीस स्टेशन, निवासी इमारती यांची उभारणी करणे, पोलीस अधिकारी व कुटुंबीय यांच्या कल्याणासाठी उपाय, मानसिक ताण-तणाव हाताळणीचे उपाय, कौशल्यपूर्ण कामकाज प्रशिक्षण देणे यासाठी सातत्याने कार्य केले आहे. सुनिल फुलारी यांचे पोलीस विभागासाठी उत्कृष्ट योगदान, निष्कलंक सचोटीसह कर्तव्यनिष्ठ गुणवत्तापूर्ण कामगिरी व प्रामाणिक शिस्तप्रिय अधिकारी असा त्यांचा पोलीस विभागातील नावलौकिक आहे. तसेच  सुनिल फुलारी यांनी पोलीसींग करीता कौशल्यपूर्ण, वैशिष्टपूर्ण योगदान सातत्याने दिले आहे. ते प्रभावी कामकाज करणारे उत्कृष्ट मार्गदर्शक अधिकारी आहेत, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने दिली आहे.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.