धक्कादायक – बांधकाम आणि ठेकेदारांचा निष्काळजीपणा … पूल पूर्ण होण्याआधीच कोसळला

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

महामार्गावरचा नवीन उड्डाणपुल लॉंचरच्या यंत्रणेसह कोसळला चिपळूणात खळबळ, राष्ट्रीय महामार्ग विभागाची धावाधाव, कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त…

चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गावर शहरातील बहादूरशेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर सोमवारी सकाळी ८ वाजता मधोमध खचल्याचा प्रकार घडला होता. मात्र दुपारी २.४५ वाजता हा पूल लॉंचरच्या यंत्रणेसह अचानक कोसळला. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांची पळापळ झाली. या घटनेने चिपळुणात खळबळ उडाली असून घटनास्थळी प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. नागरिक करत गर्डरमधील स्टीलसह काँक्रीट देखील तुटले. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाचीही धावाधाव झाली मुंबईतील अभियंता टीमला पाचारण केले आहे.

मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण बहादूरशेख नका ते प्रांत कार्यालय पर्यंत उड्डाणपूल होत आहे. हा पूल लॉंचरच्या यंत्रणेसह अचानक कोसळला. या घटनेवेळी मोठा आवाज झाला आणि जणू परिसरातील नागरिकांच्या पायाखालची जमीनच सरकली. बहाद्दूर शेख नाक्यावर एकच धावपळ उडाली. वाहन चालकांसह नागरिकांनी देखील अक्षरशः धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच आमदार शेखर निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बहाद्दूर शेख नाक्यावर प्रशासकीय यंत्रणा दाखल झाली असून नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

  • महामार्गाच्या चौपदरीकरणातील हा सर्वात मोठा उड्डाणपूल असून सुमारे १.८१ की.मी.इतकी या पुलाची लांबी आहे. तर ४६ पिलर त्यासाठी उभारण्यात आले आहेत. या पुलाच्या पिलरचे काम पूर्ण झाल्या नंतर शहरातील बहादूरशेख येथून पिलरवर गर्डर चढवण्याचे काम सुरू होते. मात्र नव्याने चढविलेले गर्डर सोमवारी सकाळी ८ वाजता काम सुरू असतानाच खचले. यावेळी मोठा आवाज झाला झाला.

या घटनेमुळे आधीच चिपळूणकर धास्तावले असताना सोमवारी दुपारी २.४५ वाजता गर्डर उभारण्यासाठी वरती ठेवलेल्या लॉंचरसह नवीन पूल कोसळला. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला असून दोन्ही बाजूनी वाहनांची रांग लागली आहे. त्यामुळे जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करून हळूहळू वाहने सोडली जात आहेत.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.