निमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे
कोल्हापूर – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना ठाकरे गट कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी आणि युवती सेना यांच्या वतीने कोल्हापूर शहरातील छत्रपती ताराराणी चौकातील करवीर संस्थापिका ताराराणी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याशेजारी असणारा भगवा झेंडा बदलून पुन्हा नव्याने फडकवला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवस जल्लोषात साजरा न करता विविध सामाजिक उपक्रमांनी राबवावा असा आवाहन शिवसैनिकांना केलं होतं. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत मांडरे यांच्या नेतृत्वाखाली हा भगवा ध्वज पुन्हा नव्याने फडकवण्यात आलाय.
स्मिता सावंत मांढरे म्हणाल्या की महाराष्ट्रात जसा मातेला सन्मान आहे तसाच छत्रपती शिवरायांच्या भगव्या झेंड्यालाही आहे भगवा झेंडा हा स्वातंत्र्यापूर्वीपासून विजयाचे प्रतीक मानलं जातं म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणचा खराब आणि जीर्ण झालेला भगवा झेंडा बदलून विधिवत नव्याने फडकवला असल्याचं सांगितलं.
या कार्यक्रमासाठी कोल्हापूर संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर महिला संपर्कप्रमुख श्रद्धा जाधव जयश्री बळीकर जिल्हाप्रमुख संजय पवार जिल्हा संघटिका शुभांगी पवार यांचे मार्गदर्शन लाभलं. यावेळी कार्यक्रमाला स्वरूपा खुरदळे अनिता ठोंबरे वर्षा पाटील माधवी लोणारे सविता कनूरकर शोभा खेडकर शुभांगी पिसाळ सुरेखा भोसले जयश्री माडीवडकर अँजेला रोबोट वर्षा पाटील अनिता पाटील रीमा देशपांडे किशोरी कोळेकर ज्योती काशीद अर्चना सातपुते वैदेही भात मिलन लोहार श्वेता सुतार सानिका दामुगडे सिद्धी दामूगडे राजेश्री मंचेकर गायत्री पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
![]() ![]() |