समाजातील सर्व स्तरातून दादासाहेब तावडे यांचे अभिनंदन… नोव्हेंबर २०२४ ते जुलै २०२६ या कालावधीसाठी निवड…
कोल्हापूर:- पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तर्फ आळते या गावचे माजी लोकनियुक्त सरपंच दादासाहेब तावडे यांची दूरसंचार विभाग सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. भारत सरकारच्या संचार मंत्रालयालयांच्या वतीने दूरसंचार विभागाची सल्लागार समिती गठीत करण्यात आली आहे. भारत संचार निगमलिमिटेड नवी दिल्ली अंतर्गत कार्यरत असणाऱ्या या सल्लागार समितीच्या सदस्यपदी दादासाहेब तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोल्हापूर दूरसंचार विभागाच्या टेलिफोन सल्लागार समिती सदस्यपदी दादासाहेब तावडे यांची नोव्हेंबर २०२४ ते जुलै २०२६ या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे. दूरसंचार विभागाच्या पी.एच.पी. सेक्शनचे सेक्शन ऑफिसर दिनेश चंद्रा यांनी श्री. दादासाहेब तावडे यांना नियतीचे पत्र दिले. मेन राजाराम प्रशालेचे दादासाहेब तावडे हे माजी विद्यार्थी असून खा. धैर्यशील माने यांचे अनमोल सहकार्य व प्रोत्साहन त्यांना मिळाले.या सल्लागार समितीच्या सदस्यपदी दादासाहेब तावडे यांची निवड झाल्याने मेन राजारामचे प्राचार्य डॉ. गजानन खाडे यांच्या सहित अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. समाजातील सर्व स्तरातून दादासाहेब तावडे यांचे अभिनंदन होत आहे.