रैलीमधे शिवाई पैनलचे पाचशे हून अधिक कार्यकर्ते सहभागी…
कोल्हापुर – सध्या एस टी महामंडळामध्ये एस टी कर्मचारी वर्गाच्या एस टी को ऑप बँकेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दि.23 रोजी पार पडत असून महाराष्ट्र एस टी कर्मचारी कॉंग्रेस, महाराष्ट्र एस टी कामगार सेना व कास्ट्राइब राज्य परिवहन कर्मचारी संघटना या कृती समितिच्या शिवाई पैनलने आज संचालक पदाचे उमेदवार नामदेव रोड़े व अरुणा पाटील यांच्या प्रचारार्थ आघाडी घेऊन मध्यवर्ती बस स्थानक येथे भव्य रैली काढत सभा घेऊन शक्तिप्रदर्शन केले. रैलीमधे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी भाग घेतला.
सध्या एस टी बँकेमधे एस टी कामगार संघटनेची सत्ता असून त्यांच्या काळात बँकेची आधोगती झाली असून त्यांनी कर्मच्याऱ्याना देणारा लाभाश 15% वरुण 7% वर आणला, बँकेस रिज़र्व बँकेकडून क दर्जा मिळाला असून बँकेची व कर्मचारी वर्गाची प्रगती करण्यासाठी तसेच कर्जावरील व्याज दर कमी करुन कर्मचारी वर्गाच्या हिताच्या विविध योजना राबविन्यासाठी बँकेमधे सत्ता परिवर्तन आवश्यक असून त्यासाठी शिवाई पैनलला विजयी करावे असे मनोगत महाराष्ट्र एस टी कर्मचारी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष संजीव चिकुर्डेकर यांनी व्यक्त केले. प्रचारफेरी दरम्यान विभागीय कार्यालयासमोर झालेल्या सभेत ते बोलत होते. तसेच ज्यानी कामगाराना विलिनीकरणाचे आमिष दाखवून एस टी व कर्मचारी वर्गाचे नुकसान केले अशा प्रवृत्तीला बँकेच्या सत्तेपासून दूर ठेवावे असे आवाहन एस टी कामगार सेनेचे प्रादेशिक सचिव वसंत पाटील यांनी केले. यावेळी कास्ट्राइब संघटनेचे सचिव दादू गोसावी, उमेदवार नामदेव रोड़े व अरुणा पाटील तसेच मान्यवरानी मनोगत व्यक्त केले.
प्रचार फेरीची सुरुवात मध्यवर्ती बसस्थानक येथून सुरु होऊन विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा, संभाजी नगर आगार येथील कर्मचारी वर्गास भेटून समाप्त झाली. रैलीमधे शिवाई पैनलचे पाचशे हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले असून शिवाई पैनलने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून आले. रैलीचे नेतृत्व संदीप घाटगे, अय्याज चौगुले, बाळासो सालोखे, इंद्रजीत घोडके,अनिल कांबळे,उत्तम पाटील, शिवाजी पाटील, अनिता पाटील, गीता पाटील, अश्विनी ढमाळ दीपाली येलबेली,संगीता बागडी आदिनी केले.