विजय बकरे
लोकराजा राजर्षी छ. शाहू महाराज जयंती विविध उपक्रमांनी लोकोत्सव म्हणून साजरी करणार…
राधानगरी – स्थानिक लोकांचा वाढता सहभाग आणि मागणी यानुसार येत्या 26 जून रोजी होणारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १४९वी जयंती त्यांनी उभारलेल्या धरणस्थळी राधानगरी येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मोत्सव समिती व तमाम शाहू प्रेमींच्या वतीने साजरी करण्यात येणार आहे. अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज राजे समरजितसिंह घाटगे यांनी राधानगरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संभाजी आरडे, विलास रणदिवे,डी.जी,चौगुले राजे बँकेचे संचालक प्रकाश पाटील,रणजीत पाटील, दीपक मगर,धैर्यशील ईंगळे आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले,मागील तीन वर्षे हा जयंती सोहळा वाढत्या लोकसहभागातून लोकराजेंच्या कार्यस्थळी साजरा करून आम्ही नवा आदर्श पायंडा पडला आहे.दरवर्षी या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून शाहू प्रेमी यावेत आणि त्यातूनच राधानगरी तालुका चांगले पर्यटन केंद्र म्हणून उदयाला यावे. ही इच्छा आहे.
शाहू महाराजांचे विचार व कार्य देशभर पोहोचविणे हाच उद्देश श्री. घाटगे म्हणाले, छ.शाहु महाराज जन्मोत्सव सोहळा येथील एका धनगराच्या सुजनेवरुन या ठीकाणी साजरा करण्यात येत आहे..जन्मोत्सव समितीने मला व पत्नी नवोदिता घाटगे यांना उपस्थित राहण्याबद्दल विनंती केली.त्यानुसार आम्ही सलग तीन वर्षे या जयंती सोहळ्यास येतआहोत. त्यामुळे बहुजन समाजाचा हा जन्मोत्सव सोहळा भव्य दिव्य पद्धतीने साजरा करुन,राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्य देशभर पोहोचविणे हाच यामागील उद्देश आहे. |
राधानगरी धरणस्थळी हा जयंती उत्सव साजरा करण्या मागील हेतू हाच आहे की राजर्षी शाहू महाराजांचे नातू, शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे नेहमी म्हणत असत की, राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना आजच्या समाजाने जयंतीपुरते, पुतळा व प्रतिमापूजन यापुरते मर्यादित ठेवले आहे. मात्र त्यांचे कार्य इतके भव्यदिव्य आहे की ते संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारे आहे. हे कार्य जगासमोर आणता येईल अशा आदर्श पद्धतीने त्यांची जयंती झाली पाहिजे.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे राधानगरीला अलौकीक निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभले आहे.जिल्ह्यातील पर्यटकांना नेहमीच याची भुरळ पडते. या निमित्ताने राधानगरी पर्यटक तालुका व्हावा, पर्यटन उद्योगातून स्थानिक नागरिकांनी चांगला रोजगार मिळावा हा उद्देश आहे. बहुजन समाजामार्फत संपन्न होत असलेला हा जन्मोत्सव सोहळा राजर्षी शाहू महाराजांचे विचार देशभर पोहोचतील या हेतूने भव्य दिव्य पद्धतीने करण्याचा मानस आहे. यासाठी परिसरातील स्थानिक लोकांनी पुढे येऊन हा सोहळा जणोत्सव म्हणून साजरा करावा ही इच्छा आहे.
सकाळी दहा वाजता ध्वजपूजन,बारा बलुतेदार व अठरा पगड जोडप्यांसह राजे समरजितसिंह घाटगे,सौ.नवोदिता घाटगे,आर्यवीरराजे घाटगे यांच्या हस्ते धरणातील पाण्याचे पूजन करून कलश जलाभिषेकसाठी आणून विधिवत पूजा करणेत येईल.सकाळी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास विधिवत जलाभिषेक,पुतळा पूजन व अभिवादन कार्यक्रम होईल.तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकेही होती. याशिवाय कागल येथे सायंकाळी सायंकाळी पाच वाजता श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्या मंदिर येथे सिने अभिनेते राहूल सोलापूरकर यांचे जाहीर व्याख्यान होईल.यावेळी भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजे फौंडेशन तर्फे कागल विधानसभा मतदारसंघात राबविलेल्या जातीचे दाखले शिबीरमधील दोनशे लाभार्थ्यांना जातीचे दाखले वाटपही करण्यात येणार आहे. तरी शाहूप्रेमी सर्व नागरिकांनी या जन्मोत्सव सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.