महिलानी बचतीला प्राधान्य देवून आदर्श निर्माण करावा
सौ.निलजा पाटील
शिराळा/प्रतिनिधी (जी.जी.पाटील)
मासिक बजेट नियमितपणे येणे आणि अनावश्यक खर्च टाळणे खूप महत्त्वाचे आहे.बचत करण्याला प्राधान्य देणे आणि त्यातून उरलेल्या रकमेत खर्च करणे हा आदर्श दृष्टीकोन आहे.असे प्रतिपादन तिरुपती तिरुमल्ला मल्टिस्टेट क्रेडिट को.ऑप. सोसायटीच्या वरिष्ठ अधिकारी सौ.निलजा पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न शिराळा तालुका पत्रकार संघ कोटेश्वर महिला मंडळ शिराळा यांच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभ प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
महिला बाल विकास अधिकारी सौ.हेमलता टोणपे या प्रमुख उपस्थित होत्या.
सौ.निलजा पाटील पुढे म्हणाल्या की,कुटुंब व्यवस्थेमध्ये आर्थिक नियोजन करण्यात महिला अधिक सरस ठरतात.
खेडेगावातील , कार्पोरेट क्षेत्रातील वा कोणत्याही क्षेत्रातील गुंतवणूक असो प्रत्येक ठिकाणी महिलांचा जास्त जवळून संबंध येतो.कारण गुंतवणूकीतील तोटे विचारात घेऊन सुरक्षित गुंतवणूक करण्याकडे महिला प्राधान्य देतात.
त्या म्हणाल्या तुह्मी तुमच्या गरजेनुसार वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.या गुंतवणूकीमुळे दीर्घकालीन फायदे मिळतात.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक सौ.सीमा डांगे यांनी केले.
यावेळी मंडळाच्या अध्यक्षा सौ.स्मिता कदम,उपाध्यक्षा सौ.नंदिनी काटकर, सचिवा सौ.सुखदा महाजन कार्याध्यक्षा सौ.दिपाली निकम,कोषाध्यक्षा सौ.वंदना जाधव,सौ.स्मिता पारेख,सौ.सुनीता निकम,सौ.नीता पाटील,सौ.ईशा शेणवी, सौ.जिज्ञा गायकवाड,सौ.राजश्री पाटील, सौ.मनीषा पाटील,सौ.रेखा मुळीक,सौ.मोहिनी तराळ, सौ.एस. जे.पाटील सौ.मंगल लाड ,सौ.रुपाली शिंदे,सौ.वारणा टिंगरे, सौ जयश्री बावचकर आदी सह महिला या समारंभात सामील झाल्या होत्या.