राष्ट्रीय लोक अदालतीचे 11 फेब्रुवारी रोजी आयोजन
राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन 11 फेब्रुवारी केले आसून यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे . जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती. के . बी . अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील औद्योगिक , सहकार , कौटुंबिक आणि कामगार न्यायालय , तसेच शाळा न्यायधिकरण राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले आहे.
विधी सेवाचे सचिव प्रितम पाटील यांनी काय आवाहन केले आहे, ते पहा. निळ्या लिंकवर क्लिक करा.
जिल्हा व सत्र न्यायालय तसेच तालुका न्यायालय कळे खेरीवडे , मलकापूर , पन्हाळा , कागल , कुरुंदवाड , इचलकरंजी, आजरा ,चंदगड , गडहिंग्लज , जयसिंगपूर , पेठवडगाव , राधानगरी येथेही अदालत होणार आहे . न्यायालयातील तडजोडीस पात्र व प्रलंबित वाद, तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपासी तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत . पक्षकार अधिवक्ता तसेच नागरिकांनी लोक आदलाती मध्ये आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत , असे आवाहन विधी सेवाचे सचिव प्रितम पाटील यांनी केले आहे .
नागरिक, समस्याधारकांनी अशा शासकीय उप्क्रमाचा लाभ घेऊन समस्या मुक्त हाेणे काळाची गरज- POSITIVVE WATCH