तावडे हॉटेल मार्गावरील खचलेल्या रस्त्याची तातडीने डागडुजी करा – सतेज पाटील

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

महापालिका अधिकाऱ्यांना सूचना…

कोल्हापूर – तावडे हॉटेल ते शाहू जकातनाका दरम्यानचा रस्ता खचू लागला आहे या बरोबरच मोठ्या प्रमाणात भेगाही पडल्या आहेत. परिणामी वाहतूकीसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आ. सतेज पाटील यांनी दखल घेत मंगळवारी या रस्त्याची पाहणी केली. यावेळी शहर अभियंता हर्षजित घाटगे उपस्थित होते.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

कोल्हापूरातील तावडे हॉटेल ते शाहू जकात नाक्या पर्यंतचा रस्ता दिवसें दिवस खचत चालला आहे. त्याच बरोबर या रस्त्याच्या मध्यभागी भेगाही पडू लागल्या आहेत. या मार्गावर वाहतूक ही मोठ्या प्रमाणात असून रात्रीच्या वेळी खचलेल्या रस्त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, या रस्त्याबाबत नागरिकांनी आम. सतेज पाटील यांचे लक्ष वेधले होते.

मंगळवारी सकाळी ९ वाजता आम. सतेज पाटील यांनी महापालिका शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्या समवेत या रस्त्याची पाहणी केली. दोन्ही बाजूनी खचलेला रस्ता, रस्त्याला पडलेल्या मोठ्या भेगा, संरक्षणासाठी रस्त्याच्या कडेला उभारलेल्या दुभाजकाचे उखडलेले खांब अशी अवस्था पाहून आ. पाटील यांनी महापालिका शहर अभियंता हर्षजित घाटगे यांना या रस्त्याची तातडीने डागडुजी व रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या भेगा मुजवण्याच्या सुचना केल्या.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.