डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आणि कोल्हापूर दक्षिणचे लोकप्रिय आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे.
कोल्हापूर – 2019 मध्ये कोल्हापूर दक्षिणमधून सर्वात तरुण आमदार म्हणून ऋतुराज पाटील यांनी विधानसभेत दिमाखात प्रवेश केला. सतत जनतेमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र झटणारे आमदार म्हणून ऋतुराज पाटील यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
कोरोनाच्या संकटाच्या काळातही जनतेशी सतत संपर्कात राहून त्यांनी अडीअडचणी सोडवण्यात आमदार ऋतुराज पाटील नेहमीच आघाडीवर होते दक्षिण विचार विधानसभा मतदारसंघाचा सर्वसामावेशक विकासाचा ध्यास घेऊन ते सतत कार्यरत आहेत गांधीनगर सह 13 गावातील पिण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तब्बल 343 कोटी रुपयांची सुधारित गांधी पाणी गांधीनगर निळ पाणी योजना त्यांनी मंजूर करून आणली आहे. तीन वर्षाच्या काळात कोट्यावधीची विकासकामे त्यांनी केली आहेत.
आमदार ऋतुराज पाटील यांचा बुधवारी वाढदिवस साजरा होत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आमदार पाटील सकाळी 9 ते 12 या कालावधीत अजिंक्यतारा कार्यालय येथे उपस्थित राहणार असून सायंकाळी 6 ते 9 या कालावधीत डी वाय पाटील कॉलेज साळोखेनगर येथे ते नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारतील. दुपारच्या कालावधीत रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिर, बॅडमिंटन स्पर्धा, फळे वाटप यासह विविध उपक्रम होणार आहेत.