शिराळा (जी.जी.पाटील)
शिराळा येथील गोरक्षनाथ मठात श्री नवनाथ ग्रंथाचे पारायण व अखंड हरिनाम सप्ताह – आनंदनाथजी महाराज
शिराळा : येथील गोरक्षनाथ मठात श्री नवनाथ ग्रंथाचे पारायण व अखंड हरिनाम सप्ताह शुक्रवार दि. १२ ते गुरुवार दि. १८ अखेर होणार असल्याची माहिती गोरक्षनाथ मठाचे आनंदनाथजी महाराज यांनी दिली. आनंदनाथजी महाराज म्हणाले, दैनंदिन कार्यक्रमात पहाटे चार ते सहा काकड आरती, सकाळी आठ ते बारा नवनाथ ग्रंथ वाचन पारायण, दुपारी बारा ते दोन संतपंगत व विश्रांती, तीन ते पाच नाथाचे भजन, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ, रात्री सहा ते सात प्रवचन, रात्री आठ ते नऊ संतपंगत, रात्री नऊ ते 11 कीर्तन असा भरगच्च धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार दिनांक 18 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे,तर ग्रंथाची सांगता पूजन गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथ जी महाराज यांचे हस्ते होणार आहे.
आनंदनाथ महाराज म्हणाले, या पारायणासाठी तालुक्यातील इतर गावातून एक तरी वाचक प्रत्येक गावातून यावा. या येणाऱ्या वाचकांची राहण्याची सोय गोरक्षनाथ मठ तर्फे केली आहे. या ग्रंथ पारायणासाठी मांगल्याचे माजी सरपंच व वारणा कारखाना संचालक विजय पाटील, शिराळाचे माजी सरपंच देवेंद्र पाटील, स्टार झुला सेंटर चिकुर्डे यांनी मानधनाची देणगीची सेवा स्वीकारली आहे.
तसेच यादरम्यान वाचकांच्या भोजनाची व नाश्तट्याची सोय महंत योगी केदारनाथजी महाराज, गोरक्षनाथ मठाचे पीर पारसनाथ जी महाराज, आ.मानसिंगराव नाईक, खा.संजय काका पाटील, सत्यजितभाऊ देशमुख, नगरसेवक केदार नलवडे, प्रदीप जोशी वकील, शंकर सोनटक्के, प्रवीण शेटे,महेश पाटील, शिराळा नगरपंचायत चे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांचे मार्फत महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे, संतोष हिरुगडे,स्वप्निल निकम, संजय पाटील, सुशांत पाटील आदींनी व्यवस्था केली आहे.