शिराळा (जी.जी.पाटील)
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ६० लाख रुपये खर्च…
शिराळा : काळूंद्रे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ६० लाख रुपये खर्च करून पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते फित कापून झाले.
यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात आमदार नाईक व माजी राज्यमंत्री नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास युवा नेते भूषण नाईक, विश्वासचे संचालक, संभाजी पाटील, सुहास घोडे-पाटील, कोंडीबा चौगुले, माजी उपसभापती नथूराम लोहार, माजी पं. स. सदस्य सर्जेराव पाटील, माजी सरपंच आनंदराव पाटील, चरणचे माजी सरपंच लक्ष्मण लमकाने, मोहन पाटील, शंकर मोहिते, वसंतराव भाडुगळे, वारणा-मोरणा संघाचे अध्यक्ष भगवान मस्के, सरपंच सौ. रेश्मा लोहार, उपसरपंच युवराज पाटील, माजी सरपंच विजय पाटील, माजी उपसरपंच संजय पाटील, शामराव पाटील, जयवंत पाटील, छोटे पाटबंधारे विभाग उपअभियंता प्रविण तेली, सोसायटी अध्यक्ष आनंदा पाटील, उपाध्यक्ष राजेश पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.