राजेश कुमार वर्मा यांनी पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला
कोल्हापूर: येथील राजेश कुमार वर्मा यांनी बुधवार दि.7 रोजी पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून जबाबदारी स्वीकारली. इंडियन रेल्वे स्टोअर्स सर्व्हिसेस (IRSS) च्या १९९३ च्या बॅचचे एक प्रतिष्ठित अधिकारी, वर्मा यांनी IIT दिल्ली मधून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी आणि मृदा यांत्रिकी आणि फाउंडेशन अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता प्राप्त केली आहे. यापूर्वी यांनी उत्तर रेल्वे मध्ये मुख्य सामग्री व्यवस्थापक म्हणून काम केले आहे.
वर्मा यांनी भारतीय रेल्वेवर उत्तर रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि उत्तर पूर्व रेल्वे, रेल कोच फॅक्टरी उत्पादन युनिट्स च्या बरोबरच RITES आणि CRIS मधील PSU वर विविध महत्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत.
यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरींमध्ये RITES Ltd, गुडगाव येथे टीम लीडर म्हणून काम करणे समाविष्ट आहे, जिथे यांनी MoHFW च्या वतीने पोलिओ आणि RCH प्रकल्पांच्या निर्मूलनासाठी औषधे आणि इतर पुरवठा खरेदीचे नेतृत्व केले. या प्रयत्नामुळे भारतभर औषधांचे सफलतापूर्वक वितरण झाले व ही औषधें सियाचीनसह देशाच्या अगदी दुर्गम ठिकाणीही पोहोचली.
वर्मा यांच्या उल्लेखनीय कामगिरींमध्ये CRIS मध्ये खरेदी प्रमुख म्हणून काम करताना विविध IT प्रकल्पांच्या सर्व पुरवठा साखळी उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे, जसे की प्रवासी तिकीट, मालवाहतूक ऑपरेशन्स, ट्रेन नियंत्रण, क्रू व्यवस्थापन, ई-खरेदी, इ. IR कार्यांचा समावेश आहे.
वर्मा त्यांच्या व्यावसायिकता, नेतृत्व, ग्राहक अभिमुखता आणि प्रभावी मॅट्रिक्स व्यवस्थापन यासाठी ओळखले जातात. यांनी ICLIF (मलेशिया) आणि INSEAD (सिंगापूर) मध्ये प्रगत व्यवस्थापन प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्याच बरोबर यांनी NIFM, फरीदाबाद येथे ‘जागतिक बँके द्वारा वित्तपोषित प्रकल्पांकरिता सामग्री, कामे आणि सेवांच्या खरेदीसाठी मानक नियम आणि कार्यपद्धती वरिल अंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम एमडीपी’ आणि जागतिक बँके द्वारे ‘जागतीक बँक खरेदी आणि सल्लामसलत मार्गदर्शक तत्त्वांचा परिचय, प्रशिक्षण अभ्यासक्रमात आईसीटी चा उपयोग आणि टीओटी चे तंत्र’ मध्ये प्रशिक्षण प्राप्त केले आहे.
यांच्याच नेतृत्वात, M&E डेपो लालागुडा/SCR ने सर्वोत्कृष्ट डेपो शिल्ड जिंकली आणि वेअरहाऊस आणि सप्लाय-चेनमध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल, यांना एकूण सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी महाव्यवस्थापकांकडून पुरस्कार प्राप्त झाला.
व्यावसायिक जबाबदाऱ्यांच्या पलीकडे, वर्मा यांनी SCR मधील विशेष गरजा असलेल्या मुलांचे व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र असलेल्या Aakansha चे मानद अध्यक्ष पद भूषवत समाजासाठी योगदान दिले.
पुणे विभागाचे विभागीय व्यवस्थापक या नात्याने, श्री वर्मा यांनी रेल्वे सुरक्षा वाढवणे, वक्तशीरपणा सुधारणे, महत्त्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण करणे आणि माननीय पंतप्रधानांच्या परिकल्पित आधुनिक भारतीय रेल्वेच्या दृष्टीकोनानुसार प्रवाशांचा अनुभव वाढवणे यासाठी स्पष्ट प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे विभागाला कार्यक्षमता आणि ग्राहकांची संतुष्टी मिळवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून लक्षणीय प्रगती प्राप्त करण्याची अपेक्षा आहे.
— —- –