|
मान्यवरांच्या हस्ते ‘पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरचे’ होणार उद्घाटन कोल्हापूर : जनसंपर्क क्षेत्राची देशातील शिखर संस्था असलेल्या पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया (PRSI)चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अजित पाठक यांनी नुकतेच कोल्हापूर चॅप्टरची घोषणा केली आहे . २१ एप्रिल रोजी राष्ट्रीय जनसंपर्क दिवसाचे औचित्य साधत या कोल्हापूर चॅप्टरचे उद्घघाटन होणार आहे. तसेच यानिमित्ताने जनसंपर्क, जाहिरात, विविध माध्यम क्षेत्रात कार्यरत व्यक्ती तसेच माध्यम क्षेत्रातील विद्यार्थी यांच्या मेळाव्याचे आयोजन दिनांक २१ एप्रिल रोजी शिवाजी विद्यापीठाच्या सांख्यिकी विभागाच्या सभागृहात सकाळी १०:३० वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके, भारतीय सुरक्षा सेनेच्या दक्षिण कमांडचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ.रवींद्र चिंचोलकर उपस्थित राहणार आहेत. शिवाजी विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या विभागप्रमुख व कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्ष, प्रा.डॉ. निशा मुडे-पवार या ‘ पीआर मीट’ च्या अध्यक्ष असतील . यावेळी ‘एपीक्यूएन’चे संचालक व चॅप्टरचे उपाध्यक्ष डॉ. जगन्नाथ पाटील, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी तथा चॅप्टरचे सचिव विश्वजीत भोसले, वारणा कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, जेष्ठ संपादक डॉ. दशरथ पारेकर, कार्यकारी संपादक राजकुमार चौगुले व कार्यकारणी सदस्य यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
ही बातमी देखिल जास्त वाचली गेली.. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचा संकल्प सर्वजण मिळून करु- पालकमंत्री प्रकाश आबिटकर
पारदर्शकता, विश्वास व प्रभावी संवाद यांच्या माध्यमातून लोकशाही अधिक बळकट करण्यामध्ये जनसंपर्क क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच पीआरएसआय संपूर्ण देशभरातील चॅप्टरच्या माध्यमातून “जनसंपर्क – लोकशाहीचा पाचवा स्तंभ” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारिल ‘जनसंपर्क दिवस’ आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सबंधित क्षेत्रातील व्यक्तींसाठी खुला असून इच्छुकांनी सोबतच्या क्यूआर कोडद्वारे किंवा https://forms.gle/hoVVKujSznQAWazn7 या लिंकद्वारे नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी करून कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या सहभागींना प्रमाणपत्र दिले जाईल. कोल्हापूर चॅप्टरच्या स्थापनेद्वारे पश्चिम महाराष्ट्रात जनसंपर्क क्षेत्रातील व्यावसायिक, विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी ज्ञानविनिमय, नेटवर्किंग आणि कौशल्यविकासाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. जनसंपर्क क्षेत्रातील व्यावसायिक, विद्यार्थी, मीडिया प्रतिनिधी तसेच माध्यम क्षेत्रातील अभ्यासक यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरचे सचिव विश्वजीत भोसले यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टर आणि पत्रकारिता विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. सोबत : कार्यक्रम नोंदणी करण्याकरिता क्यूआर कोड |
जनसंपर्क क्षेत्रातील दिग्गज कोल्हापुरात येणार; ‘पीआरएसआय’ कोल्हापूर चॅप्टरचा शुभारंभ
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375





































































